फैजपूर (प्रतिनिधी) फैजपूर शहरात लॉकडाऊन नंतर हाजीरा स्टार क्रिकेट टिमच्या युवकांनी पुढाकार घेऊन दिनांक ३० नोव्हेंबर रोजी हाजीरा स्टार क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केली होती. सलग नऊ दिवस ही टुर्नामेंट चालली त्यामुळे कोरोना काळात लॉकडाऊन मुळे घरी बसुन कंटाळलेल्या खेळाडूंना तसेच प्रेक्षकांना देखील बर्याच दिवसांनी खेळाचा आनंद लुटता आला.
अंतिम सामना हाजीरा स्टार टिम ए आणि हाजीरा स्टार टिम बी यांच्यात होऊन प्रथम क्रमांकाचे ११००० रु. चे काँग्रेस गटनेते कलीम खान मण्यार यांच्या हस्ते रोख पारितोषिक हाजीरा क्रिकेट टिम ए चे कप्तान सद्दाम खान अफजल खान यांनी स्विकारले. तर दुसरे पारितोषिक अलखिजर सोसायटी सचिव शेख एजाज शेख हारुन शेठ यांच्या हस्ते ५५५५ रु. उपविजेता हाजीरा क्रिकेट टीम बि चे कप्तान मोसीम खान समद खान यांना देण्यात आले. सर्वांत जास्त धावा काढल्याबद्दल बॅटसमन शेख फैजान यांना फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्ते शेख आसिफ मेकॅनिक यांच्या हस्ते देण्यात आले. सर्वांत जास्त विकेट घेतल्या बद्दल बॉलर शेख रेहान यांना अलखिजर सोसायटी अध्यक्ष डॉ. दानिश शेख यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या टुर्नामेंट मधे उत्कृष्ट झेल (कॅच) घेतल्याबद्दल शेख मोईन यांना इंडिया स्टील फर्नीचर चे निसार खान यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. रावेर यावल विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वसीम जनाब, सामाजिक कार्यकर्ते फारुक शेख अब्दुल्ला यांनी अनमोल सहकार्य केले तर टुर्नामेंट च्या यशस्वीतेसाठी सद्दाम खान, मोसीम खान, मोईन इफ्तेकार, अफसर यांनी परिश्रम घेतले तर सुत्रसंचलन काझी मुजम्मील अहमद यांनी केले.