जबलपूर (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये एका चोर चोरीच्या उद्देशाने दुकानात शिरला होता. पण यादरम्यान त्याला झोप आली तर तो दुकानातच झोपला. सकाळी जेव्हा दुकानदाराने दुकान उघडलं आणि आत पाहिलं तर चोरी करण्यासाठी आलेला चोर ढारादूर झोपला होता. दुकानदाराने चोराला उठवण्याचा प्रयत्न केला तर तो दुकानदाराला म्हणाला की, आता नाही, थोडावेळ आणखी झोपू दे भाऊ. यानंतर चोराला पोलिसांच्या हवाली केलंय.
सोमवारी रात्री जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली होती. त्यामुळे दुकानदार लवकरच दुकान बंद करून घरी गेला होता. थंडी भरपूर असल्याने शहरातील रस्त्यांवरही शांतता होती. लोक घराबाहेर पडत नव्हते. याचाच फायदा घेत एका चोर आनंद टी स्टॉलमध्ये लॉक तोडून आत शिरला. चोराने दुकानातील कोपरान कोपरा शोधला, सगळं सामान फेकलं.
पण कडाक्याच्या थंडीमुळे तो बाहेर आला नाही आणि दुकानातच कोपरा पकडून झोपला. झोपेमुळे त्याला हे लक्षातच राहिलं नाही की, तो कोणत्या कामासाठी आला होता. तो दुकानातच झोपून राहिला. सकाळी ५ वाजता दुकानदार दुकानात आला आणि त्याला दिसलं की, सगळं सामान अस्वाव्यस्त आहे. दुसरीकडे पाहिलं तर एक चोर तिथे गाढ झोपेत होता.
दुकानदाराने चोराला उठवण्याचा प्रयत्न केला तर तो दुकानदाराला म्हणाला की, आता नाही, थोडावेळ आणखी झोपू दे भाऊ. दुकानदाराच्या लक्षात आलं की, चोर चोरीच्या उद्देशाने दुकानात आला होता, आणि थंडीमुळे तो इथेच झोपला. दुकानदाराने कसंतरी चोराला उठवलं आणि तो त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला.