लातूर (वृत्तसंस्था) अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथील ११ वर्षीय मुलाचा जढाळा रोडवरील पाझर तलावात बुडून मंगळवारी (दि१४ ) दुपारी मृत्यू झाला. सत्यम हानमंत होनाळे (वय ११), असे मृत मुलाचे नाव आहे.
धानोरा येथील मजुर हानमंत होनाळे यांचा ११ वर्षीय सत्यम मुलगा हा मित्रासोबत मंगळवारी दुपारी जढाळा रोडवरील पाझर तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने नाकातोंडात पाणी जावुन त्याला कडीला येता आले नसल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जखमी सत्यमला किनगाव येथील प्राथमिक अरोग्य केंद्राता उपचारासाठी आणले तेंव्हा उपस्थित डॉक्टरांलह मृत घोषीत केले. वैद्यकिय अधिकारी डॉ श्रध्दा सातपुते यांच्या माहितीवरून किनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.