वर्धा (वृत्तसंस्था) दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात पुलगाव ते वर्धा रस्त्यावर ३० रोजी रात्रीच्या सुमारास झाला. याप्रकरणी पुलगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सोमवारी रात्री एका दुचाकीने स्वप्नील धाबर्डे पुलगांव येथून वर्धा रोडवरील रमाई नगर पेट्रोल पंप येथे जात होता. वर्धा येथून येत असलेल्या दुचाकीने संकेत शिवराम कुजांम (१९) व शुभम खोबरे (२८) हे दोघे प्रवास करीत होते. ही दोन्ही दुचाकी वाहने समोरा सामोर जोरदार धडकली. या अपघातात संकेत कुजांम हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. रूगणवाहिके मधून स्वप्नील व शुभम या दोघांना वर्धा येथील रुग्णालयामध्ये पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले.
स्वप्नील धाबर्डे (३२) याला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले . शुभम याच्यावर सेवाग्राम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. अपघात ग्रस्त झालेली दोन्ही वाहने अतिवेगात असल्यामुळे ती नियंत्रित झाली नाही व सामोरा सामोर धडकली. त्यामुळेच हा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.