जळगाव (प्रतिनिधी) आज दि. ११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता फुले मार्केट येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे (राजुमामा) व महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक राजू मराठे, ओबीसी आघाडी अध्यक्ष जयेश भावसार, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, उद्योग आघाडी अध्यक्ष संतोष इंगळे, हॉकरस आघाडी अध्यक्ष नंदु पाटील, अध्यक्ष फुले हॉकर्स असोसिएशन प्रशांत माळी आदी उपस्थितीत होते.