TheClearNews.Com
Friday, February 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट

The Clear News Desk by The Clear News Desk
January 30, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राजधानी दिल्लीतला सर्वाधिक सुरक्षित मानला जाणारा ल्युटन्स झोन शुक्रवारी संध्याकाळी एका बाँब स्फोटाने हादरला. हा स्फोट इस्रायल दूतावासाजवळ झाला. या स्फोटात जीवितहानी झालेली नसली, तरी विजय चौकाजवळ झालेल्या स्फोटाने राजधानी हादरली आहे. देशभरातल्या महत्त्वाच्या शहरांतली सुरक्षा यंत्रणा कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः मुंबई हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.

दिल्लीत इस्रायलच्या दुतावासा जवळ स्फोट झाल्यानंतर आता मुंबईत पोलिसांनी हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईच्या विमानतळावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रेल्वे स्थानके बस स्थानकांवर आणि महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. विविध ठिकाणी नाका बंदी ही करण्यात येणार आहे. दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस महासंचालक यांच्याशी चर्चा केली आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. दिल्लीतील इस्त्रायली दुतावासाबाहेर झालेल्या स्फोटानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळविण्याचे आवाहन केले आहे. इस्रायली दूतावासाशेजारी झालेल्या स्फोटाची जबाबदारी सध्या कोणत्याही दहशतवादी गटाने घेतलेली नाही. मात्र, हा स्फोट कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत. दिल्लीतील स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांनाही सतर्क केले गेले आहे. या स्फोटात अद्याप कोणत्याही व्यक्तीच्या जखमीची माहिती नाही. गुप्तचर अधिकारी, विशेष सेल आणि गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करत आहेत. स्फोटाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. इस्त्रायली दूतावासापासून १५० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. अग्निशमन विभागाची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. जेथे हा स्फोट झाला ते ठिकाण विजय चौकपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे. विजय चौक येथे बीटिंग रिट्रीट चालू होते. या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

दिल्लीत इस्रायलच्या दूतावासाबाहेर आयईडी स्फोट झाल्यानंतर या घटनेचा तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील भागात हा स्फोट घडवण्यात आल्याने सर्व यंत्रणा हादरल्या आहेत. कुणीतरी दहशत पसरवण्यासाठी हा खोडसाळपणा केला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असला तरी सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. दुसरीकडे इस्रायलचे अधिकारी सातत्याने भारताशी संपर्कात आहेत. इस्रायलने हा दहशतवादी हल्ला असल्याची भीती व्यक्त केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

अमळनेर येथील अर्बन बँक ठरली भारतात अग्रगण्य सहकारी बँक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

DCGI कडून मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

January 3, 2021

जिल्ह्यातील डेंग्यू साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने शर्तीचे प्रयत्न करावेत : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

October 9, 2023

मद्य प्राशन प्रकरण ; ‘मजिप्रा’ शाखा अभियंत्यासह एक निलंबीत ; पाणी पुरवठा मंत्र्यांचा दणका !

August 6, 2021

धरणगाव महिला आघाडीच्या उप तालुका प्रमुखपदी उषाबाई गुरव यांची निवड !

May 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group