चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका उच्च शिक्षित तरुणीचे नियोजित लग्न मोडणाऱ्या तरूणाविरुद्ध चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत तरुणीने चाळीसगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिचे लग्न २३ जून रोजी ठरलेले होते. परंतू ओळखीचा अमित राजेंद्र शिरुडे याने वेळोवेळी फिर्यादीसोबत वेगवेगळ्या मोबाईल क्रमाकावरुन फोन, मॅसेज करून तसेच फिर्यादीचे जमलेल्या लग्नठिकाणी खोटेनाटे सांगून तिचे नियोजीत लग्न मोडले. तसेच माझ्यासोबत लग्न कर असे म्हणून सतत ऐनकेन प्रकारे फोनवर पाठलाग केला.
वेगवेगळे मोबाईल नंबर वापरून त्रास देऊन, मानसिक छळ करून, मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच पिडीत तरुणीसोबत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर, पिडीतेच्या आई वडिल, नातेवाई अशांना शिवीगाळ करुन धमकी दिली. या प्रकरणी अमित शिरुडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि. दिपक बिरारी हे करीत आहेत.