TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात हिजाबच्या समर्थनात हिंदू-मुस्लीम रणरागिनी मैदानात

मुस्लिम विद्यार्थिनींना सुरक्षा दया ; कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब (बुरखा) घालण्यास बंदी घातली गेली. त्याविरोधात मुस्लिम विद्यार्थिनींनी आंदोलन केले असता ती बंदी काही अंशी उठवण्यात आली. परंतु, ज्या विद्यार्थिनी हिजाब घालून येतील त्या विद्यार्थिनींना वेगळ्या क्लास रूम (वर्ग खोली) मध्ये बसवण्यात येईल असे ठरले त्यावरही विद्यार्थिनीनी आपली सहमती दर्शवली असता आज विद्यार्थिनी आपल्या शिक्षणासाठी महाविद्यालयात येतांना त्यांना काही भगवा मफलर (पट्टा) धारण केलेले तरुण युवकांनी महाविद्यालयात येण्यास मज्जाव केला.

या सर्व गोष्टीच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील हिंदू- मुस्लिम महिला यांनी प्रतिसाद देत जिल्हाधिकारी कार्यालय गाठुन कर्नाटक सरकारचा तिव्र निषेध करून जिल्हाधिकारी जळगावमार्फत पंतप्रधान व राष्ट्रपतींना निवेदन दिले.

READ ALSO

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

निवेदनातील प्रमुख चार मागण्या

१) कर्नाटक सरकारला त्वरित सुचित करण्यात यावे की ज्या शिक्षण संस्थानी हिजाब (बुरखा) वर विद्यार्थिनींवर लावलेली बंदी मागे घेण्यात यावी.
२) भारतीय घटनेतील कलम २५ अनुसार प्रत्येक भारतीयाला जे स्वातंत्र्य दिलेले आहे. त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर शिक्षण संस्थांनी गदा आणता कामा नये.
३) कर्नाटक मधील शिक्षण संस्थांना आदेश पारित करावे की मुस्लिम विद्यार्थिनींचे सोबत विद्यार्थिनींना फ्रीडम ऑफ चॉइस देण्यात यावे व त्यांना सर्वा सोबत वर्गामध्ये बसु द्यावे.
४) अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थिनी हिजाब घालून महाविद्यालयात- शाळेत येत आहेत. त्यांना भगवाधारी तरुणाई रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या तरुणाई वर त्वरित कडक कायदेशीर कारवाई करून त्या मुस्लिम विद्यार्थिनींना सरकारने सुरक्षा प्रदान करावी.

शासनाला अल्टिमेटम

कर्नाटक शासनाने वेळीच आपले निर्बंध हटवले नाही व मुस्लिम विद्यार्थिनींना सुरक्षा प्रदान केली नाही तर जळगाव जिल्ह्यातून त्यांच्या कृती च्या निषेधार्थ सर्वधर्मीय महिला व पुरुष मिळून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू त्यात रॅली, साखळी उपोषण, धरणे आंदोलन, आदींचा समावेश राहील असे जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी आंदोलकांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.

निवेदनावर व निवेदन देताना यांची होती उपस्थिती

एरंडोल नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष शकुंतला अहिरराव, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीच्या प्रतिभा शिरसाट, महिला सुरक्षा समितीच्या निवेदिता ताठे, भुसावळच्या जयश्री इंगळे, वरणगावच्या सविता माळी व शारदा वाणी, जळगावच्या हाजरा फारुक शेख, एडव्होकेट नसरून फातेमा पिरजादे, बुशरा अमीर शेख, फरज़ाना अनिस शाह, निखत परवीन, आदना कश्यप, हुमेरा तय्यब शेख, सायमा तय्यब शेख, तकदीस ताहेर शेख, शगुफ्ता शिरीन, फारुक शेख अब्दुल्ला, अनीस शाह, एम आय एम उत्तर महाराष्ट्र विद्यार्थी कृती समितीचे तथा विदर्भाचे प्रमुख सनेर सय्यद, अकील अहमद, मोहम्मद इस्माईल, शौकत अली पेंटर मेहरून, आसिफ शेख गफार, एरंडोल चे इम्रान सय्यद, मुस्ताक शेख, शाह बिरादरीचे मुक्तार शाह, उस्मानीया पार्कचे समीर शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष मजहर पठाण, शिवसेना महानगर अध्यक्ष जाकिर पठाण, समाजवादी पक्षाचे इक्बाल उद्दीन शेख व महिला आघाडी प्रमुख साजिया शेख, काँग्रेसचे बाबा देशमुख व नदीम काझी, राष्ट्रवादीचे सलीम इनामदार व अकील पटेल, कुल जमातीचे डॉक्टर जावेद शेख, वहीदत ए इस्लामी चे अतीक शेख, जळगाव स्पोर्टस हाऊसचे एडवोकेट अमीर शेख, एमआयएमचे जिल्हाअध्यक्ष अहमद व महानगर अध्यक्ष दानिश सय्यद, अपनी गलीचे आताऊल्ला खान, शिकलगार बिरादरीचे अन्वर खान व अज़ीज़ शिकलकर, काकर बिरादरीचे रियाज काकर ,खाटीक बिरादरीचे डॉक्टर रिजवान खाटीक, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, बुधवार ९ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..आज 'चॉकलेट डे'ला कसा असेल तुमचा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. नितु पाटील यांना आएमए राष्ट्रीय अध्यक्ष उत्कृष्ट खेळ प्रतियोगीता पुरस्कार जाहीर !

December 26, 2023

भयंकर ! दुसऱ्या बॉयफ्रेंडचा फोन आल्याचा राग, बॉयफ्रेंडनं केला गर्लफ्रेंडचा खून

October 24, 2021

जिल्ह्यात आज आढळले ८७७ कोरोनाबाधित, ७२० झाले बरे !

May 8, 2021

राष्ट्रीय छात्र सेनेचा जन आंदोलन अभियानात सक्रिय सहभाग !

October 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group