बुलढाणा (वृत्तसंस्था) बुलढाण्यात समलैगिंक संबंधातून एकाचा खून झाल्याचा प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथील श्रीराम शेळके यांचा समलैगिंक संबंधातून मारहाण केल्याने खून झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात विविध पद्धतीने शुटींग करून वारंवार पैशाची मागणी करण्यात आल्याचेही कळते. त्यामुळे आनंद गवई यांच्यासह पोलिसांनी त्यांच्या सहा मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताचे आणि आनंद गवई यांचे समलैगिंक संबंध होते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात बडे गाव येथील श्रीराम शेळके यांच्या मृत्यूवर अनेकांनी संशय व्यक्त केला होता. त्याचवेळी श्रीराम शेळके यांचे आनंद गवई यांच्यासोबत समलैंगिक संबंध असल्याची चर्चा सुरु झाली. चर्चेनुसार अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडीओ तयार करून शेळके यांना ब्लॅकमेलींग सुरु असल्याची चर्चा होती. या प्रकरणी आनंद गवई यांच्यासह सहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.