जालना (वृत्तसंस्था) समलैंगिक व अनैतिक संबंधातून बँक अधिकारी असलेले प्रदीप भाऊराव कायंदे कायंदे (४०, उंबरखेड, ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा) यांचा खून झाल्याची बाब शुक्रवारी उघड झाली. या प्रकरणी मंठा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पोलिस तपासातील माहितीनुसार एका एजन्सीमार्फत एचडीएफसी बँक वसुली अधिकारी म्हणून काम करणारे प्रदीप कायंदे यांचे कार्यक्षेत्र जालना होते. ते बोल्ड गे ॲपवरून समलिंगी संबंध ठेवणाऱ्या एका ग्रुपच्या संपर्कात आले होते. घरी पत्नी-मुलं असतानाही समलिंगी संबंधाची चटक लागलेले प्रदीप अनेकदा कामावरून देऊळगावराजा येथे घरी न जाता ते मंठा येथील त्याच्या समलिंगी संबंध ठेवणाऱ्या मित्राच्या घरी जात होता. ७ एप्रिल रोजीही प्रदीप कायंदे जालना येथून थेट मंठा येथे त्याच्या मित्राच्या शांतीनगर येथील घरी मुक्कामाला पोहोचला होता. त्याने आधी ठरल्याप्रमाणे आपल्या संमलिगी मित्रासोबत लैंगिक संबंध ठेवले.
मयत हा दोन वर्षांपासून आरोपीसोबत समलैंगिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर आरोपीच्या पत्नीसोबतही अनैतिक संबंध ठेवत असल्याची धक्कादायक बाबही तपासात पुढे आली आहे. यातून दोघांमध्ये त्या रात्री वाद झाला. त्यानंतर समलैंगिक आरोपी मित्राने त्याच्या काही अन्य मित्रांना बोलावून प्रदीपला बेदम मारले. यात प्रदीप हा ठार झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रदीप याचा मृतदेह मोटारसायकलवरून आरोपीने त्याच्या भाऊच्या मदतीने बाजार समितीच्या आवारात टाकला. यामध्ये एकूण चार आरोपी आहेत. त्यांपैकी दोघांना अटक केली करण्यात आली आहे. दरम्यान, सदर प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती काही आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ आणि मोबाईल संभाषणही हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.