अमळनेर (प्रतिनिधी) येथील नामवंत खान्देश शिक्षण मंडळाच्या जी.एस.हायस्कुलचे क्रीडाशिक्षक,अमळनेर तालुका अध्यक्ष व राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त सुनिल वाघ यांना पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते शाल, बुके, सन्मान पत्र, सन्मान चिन्ह देऊन आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रात प्रथमच होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य शा.शि.व क्रीडा शिक्षक महासंघाचे वरिष्ठ सचिव प्रा.राजेशजी जाधव यांच्या संकल्पनेतून साकारली आहे.या सोहळयासाठी माध्य.शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील,जिल्हा शा.शि.व क्रीडा शिक्षक महासंघ अध्यक्ष डॉ.प्रदीप गुरुजी तळवलकर, महाराष्ट्र अॅथलेटिक्स उपाध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ.नारायण खडके,कबड्डी राष्ट्रीय खेळाडू व नगरसेवक नितीन बरडे, प्रशांत जगताप,प्रशांत कोल्हे,प्रविण पाटील उपस्थित होते.
या सोहळ्यात सुनिल वाघ यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश मुंदडे, कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल,शाळा समिती चेअरमन प्रदीप अग्रवाल, संस्थेचे संचालक जितेंद्र जैन, हरी वाणी, डॉ.बी.एस.पाटील, डॉ.संदेश गुजराथी, कल्याण पाटील, चिटणीस डॉ.ए.बी.जैन, संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी डिगंबर महाले, मुख्याध्यापक पी.एल.मेखा, उपमुख्याध्यापक ए.एस.करस्कर, पर्यवेक्षक व्ही.व्ही.कुलकर्णी शिक्षक प्रतिनिधी डी.एम.दाभाडे तसेच सर्व शिक्षकांनी व जिल्ह्यातील सर्वांनी अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण पाटील, किशोर पाटील, समीर घोडेस्वार, योगेश सोनवणे, उमाकांत जाधव या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.