जामनेर (प्रतिनिधी) ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या प्रमुख उद्देश असलेल्या श्री गुरुदेव सेवा आश्रमचे गादीपती परमपूज्य श्याम चैतन्यजी महाराज यांनी आपल्या आश्रमात कन्यांचा सन्मान केला. त्यांचे पाय धुऊन, पुसून सन्मानाने त्यांचे औक्षण व पूजा करून त्यांना पोटभर भोजन जेऊ घातले. यावेळी प्रत्येक कन्येला महाराजांनी दक्षिणा म्हणून भेटही दिली.
यावेळी उपस्थित बाल कन्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद विशेष होता. सर्व कन्या सजून शृंगार करून आल्या होत्या. दरवर्षी आश्रमातर्फे जामनेर परिसरातील खेड्यापाड्यातील मोठ्या प्रमाणात कन्यांचे पूजन केले जाते. मात्र यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मोजक्या कन्यांना आमंत्रित करून त्यांना खऱ्या दुर्गा समजून त्यांची पूजा केली. घराघरात कन्यांचा सन्मान व्हावा यातून याच उद्देशाने दरवर्षी कन्या भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो यावेळी महाराजांनी रावेर बोरखेडा येथील दलित हत्याकांड तसेच समाजात होणारे मुलींवर अन्याय अत्याचार याचा निषेध करून अशा घटनांमध्ये दोषी असणाऱ्यांना शासन तथा न्यायपीठाने तात्काळ कठोर शिक्षा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी आश्रमात आश्रमाचे ट्रस्टी, कन्यांचे माता पिता उपस्थित होते.कार्यक्रमास तालुका प्रकल्प अधिकारी ईश्वर गोयल साहेब, रवींद्र महाजन, प्रा. उमाकांत पाटील (साईमत )गोकुळ चव्हाण, ईश्वर नाईक, मनोज जाधव, दिलीप नाईक, जितेंद्र राजनकर, गणेश राठोड, सुनील जाधव, गणेश भोईटे, विष्णू राठोड विजय पाटील संदीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते