TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : जाणून घ्या..साप्ताहिक राशिभविष्य, २० ते २६ मार्च २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

साप्ताहिक राशिभविष्य, २० ते २६ मार्च २०२२ : या आठवड्यात बुध आणि गुरु या दोन ग्रहांची स्थिती बदलत आहे. या ग्रहांच्या मार्गक्रमणाचा प्रभाव सर्व राशीवर राहील. या ग्रहांच्या राशीपरिवर्तनामुळे करिअर, आर्थिक, कौटुंबिक जीवन, आणि प्रेम जीवनावर परिणाम होईल.

मेष :-
सप्ताहारंभी बुध-गुरू युतियोगाची अतिशय छान पार्श्‍वभूमी राहील. भरणी नक्षत्राच्या तरुणांनी सतत ऑनलाइन राहावं. नोकरीसाठीच्या मुलाखतींतून यश. ता. २१ व २२ हे दिवस मोठी भाग्यबीजं पेरतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी राजकारणापासून दूर राहावं. अश्‍विनी नक्षत्रास शुक्रवार स्पर्धात्मक यशाचा, पुत्रोत्कर्ष.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

वृषभ :-
मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांचं फिल्ड सप्ताहात बॅटिंग फिल्ड राहील. एक छान सूर गवसेल. बुध- गुरू युतियोगाचं फिल्ड ओळखी- मध्यस्थीतून क्‍लिक होईल. ता. २३चा बुधवार वैयक्तिक सुवार्तांतून चर्चेत राहील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक येणी येतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींची ता. २२ची रंगपंचमी स्त्रीमुळे बेरंगाची.

मिथुन :-
बुध- गुरू- नेपच्यून सहयोग पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी यश-प्रसिद्धी देणारा. सप्ताहाची सुरुवात मोठी अजब राहील. कलाकारांना मोठे लाभ. काहींना सरकारी बहुमान! आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी यंदाची रंगपंचमी जरा जपून खेळावी. बेरंग नको. व्रात्य मित्रांची संगत नको. बाकी शुक्रवारचा दिवस मोठ्या सुखस्वप्नांचा. वास्तुयोग.

कर्क :-
सप्ताहात कोणतीही अरेरावी नको. नाकासमोर चाला. स्त्रीवर्गाशी थट्टामस्करी नको. बाकी व्यावसायिकांना ता. २१ व २२ हे दिवस चांगलीच रंगपंचमी घडवतील. विशिष्ट करारमदार होतील. उत्सव-प्रदर्शनांतून सुंदर प्रतिसाद. पुष्य नक्षत्रास सरकारी माध्यमातून सहकार्य. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सासुरवास. वाद नकोत.

सिंह :-
सप्ताहातील बुध- गुरू- नेपच्यून त्रिग्रह योगाचं पॅकेज चांगलंच फलदायी होईल. पूर्वा आणि उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना जनसंपर्कातून मोठे लाभ. मंत्रालयातून मोठी कामं होतील. तरुणांना गॉडफादर भेटेल. ता. २२ व २३ हे दिवस खरोखर जीवनात रंग भरतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी प्रवासात जपा.

कन्या :-
सप्ताहात अन्न-पाण्यातील संसर्ग जपाच. बाकी व्यावसायिकांना सप्ताह मंगळ- शुक्राच्या साथसंगतीतून, उत्सव-प्रदर्शनांतून उत्तम प्रतिसाद देईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती दिलखुलास वावरतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी जुगारी मित्र टाळावेत. बाकी ता. २१ व २२ हे दिवस प्रचंड प्रवाही. नव्या ओळखींतून लाभ. कोर्ट प्रकरण मिटेल.

तूळ :-
राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये धमाल उडवणार आहात. आपल्या मध्यस्थीतून मोठी कामं होतील. ता. २१ व २२ हे दिवस चौकार- षटकारांचेच. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना नक्षत्रलोकांतून लाभ. सतत आगतस्वागत आणि अर्थपुरवठा. नवपरिणितांचे प्रश्‍न सुटतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुप्रचिती मिळेल. नोकरीत सन्माननीय पद मिळेल.

वृश्‍चिक :-
सप्ताह व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनं गाजवेल. मंत्रालयातील कामं होतील. विशाखा नक्षत्रास पुत्रोत्कर्ष. अनुराधा नक्षत्रास ता. २२ व २३ हे दिवस आत्यंतिक प्रवाही राहतील. विवाहविषयक गाठीभेटी कराच. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना परिस्थितिजन्य मोठे लाभ. स्त्रीवर्ग प्रसन्न राहील. अर्थातच, देवता प्रसन्न राहतील.

धनू :-
गुरू- बुध- नेपच्यून त्रिग्रह योगाचं पॅकेज उत्तम रन होईल. जनसंपर्कातून मोठे लाभ. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे धनलाभ. एखादा वादग्रस्त भूखंड सोडवाल. ता. २१ व २२ हे दिवस मोठी रंगतदार फळं देतील. वैयक्तिक मोठे समारोह. उत्तराषाढास विवाहयोग. मूळ नक्षत्रास शुक्रवार भाग्याचा.

मकर :-
सप्ताहात मंगळ- शुक्र सहयोग राहणारच आहे. सप्ताहाची सुरुवात करारमदार, गाठीभेटी आणि व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनांतून उत्तम प्रतिसाद देणारी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती परिस्थितिजन्य लाभ उठवतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांचं पाठबळ राहील. मात्र, सार्वजनिक ठिकाणी आचारसंहिता पाळा. रंगपंचमीच्या मंगळवारी सावध!

कुंभ :-
राशीतील बुध- गुरू युतियोगाचं एक छान स्पंदन किंवा आवर्तन राहील. तरुणांना सप्ताह छानच. महत्त्वाच्या नोकरीच्या मुलाखती होतील. ता. २१ ते २३ हे दिवस विशेष उलाढालींचे राहतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींवर देवता प्रसन्न राहतील. अर्थातच, निसर्ग अनुकूल राहील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्ष धन्य करेल.

मीन :-
सप्ताहात गुरू- बुध- नेपच्यून सहयोगाची एक अद्‌भुत पार्श्‍वभूमी राहील. व्रतवैकल्यं फळास येतील. ता. २३ ते २५ हे दिवस तरुणांचे प्रश्‍न सोडवणारे. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना एखादा गॉडफादर भेटेल. नोकरीतील अरिष्ट जाईल. घरातील तरुणांचे प्रश्‍न सुटतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींस शुक्रवार मोठ्या सुवार्तेचा. धनलाभ.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

पोलीस ठाण्यात सीसीटिव्ही कार्यान्वित नसल्यास पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ वानरांना अखेर वनविभागाने केले जेरबंद !

December 19, 2021

भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख, गृहमंत्री संतापले

January 28, 2021

पल्स पोलिओ लसीकरणाचा पहिला डोस अमरावतीतुन

January 31, 2021

कोरोना : जिल्ह्यात आज आढळले ६३१ बाधित ; जामनेरात सर्वाधिक १४५ रुग्ण !

May 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group