राशीभविष्य, शुक्रवार ४ फेब्रुवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?
मेष राशी :-
नव्या ओळखी होतील. महत्त्वाची कामं होतील. लोकांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण कराल. आजचा दिवस छान जाईल. आजचा शुभ रंग – गुलाबी
वृषभ राशी :-
तब्येत जपा. दगदग कमी करा. स्वतःची तसेच घरातल्यांची काळजी घ्या. ज्येष्ठांना वेळ द्या. दिवस चांगला जाईल. आजचा शुभ रंग – पांढरा
मिथुन राशी :-
तब्येत जपा. कायदा पाळा. वाहन चालवताना काळजी घ्या. स्वतःला वेळ द्याल. दिवस चांगला जाईल. आजचा शुभ रंग – हिरवा
कर्क राशी :-
अपेक्षा न बाळगता कर्म करा. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. सावध राहा. दिवस बरा जाईल. आजचा शुभ रंग – आकाशी
सिंह राशी :-
वास्तवाचे भान राखा. परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. शब्दांचा वापर जपून करणे लाभाचे. दिवस बरा जाईल. आजचा शुभ रंग – लाल
कन्या राशी :-
मनाला आवरा. परिस्थितीचा अंदाज घेऊन वागा. कायदा पाळा. दिवस चांगला जाईल. आजचा शुभ रंग – मोरपिशी
तूळ राशी :-
नव्या ओळखी होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामं होतील. दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग – पांढरा
वृश्चिक राशी :-
वाद टाळणे, रागाला आवर घालणे आणि शब्द जपून वापरणे हिताचे. तणावाचे व्यवस्थापन करणे हिताचे. तब्येत सांभाळा. दिवस बरा जाईल. आजचा शुभ रंग – नारिंगी
धनु राशी :-
प्रगतीचा योग आहे. थांबू नका. कार्यरत राहा. सत्कर्म घडेल. दानधर्म करा. दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग – पिवळा
मकर राशी :-
नव्या ओळखी होतील. संवादातून अडचणी दूर होतील. हुशारीने वागणे आणि शब्दांचा सुयोग्य वापर करणे हिताचे. आजचा शुभ रंग – राखाडी
कुंभ राशी :-
स्वतःची स्तुती स्वतःच करणे टाळा. नियोजन आणि प्रयत्नांतील सातत्य महत्त्वाचे आहे. आर्थिक नियोजन हिताचे. दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग – तपकिरी
मीन राशी :-
ज्येष्ठांचा आणि अनुभवींचा आदर करणे हिताचे. हुशारीने वागणे आणि शब्दांचा मोजून मापून वापर करणे फायद्याचे. दिवस चांगला आहे. दानधर्म करा. आजचा शुभ रंग – सोनेरी