आजचे राशीभविष्य, सोमवार २८ फेब्रुवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?
मेष राशी :-
उत्पन्न स्थिर राहील. उत्साहात किंवा आनंदाच्या क्षणात सामील होण्याची संधी मिळेल. जोडीदाराकडून प्रेम मिळेल. आजचा शुभ रंग- चंदेरी
वृषभ राशी :-
चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. दिवसभर कुठलीतरी चिंता जाणवले.आर्थिक प्रगतीसाठी संधी मिळतील. आजचा शुभ रंग – पांढरा
मिथुन राशी :-
विनाकारण धावपळ होईल. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ जाईल. अविवाहित तरुण तरुणींसाठी योग्य जोडीदार मिळेल.आजचा शुभ रंग – हिरवा
कर्क राशी :-
जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. व्यवहार करताना घाई करू नका. चांगली बातमी कानावर येईल. आजचा शुभ रंग – किरमिजी
सिंह राशी :-
ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. आजचा शुभ रंग- जांभळा
कन्या राशी :-
नोकरीच्या ठिकाणी अधिकार वाढतील. नोकरीच्या ठिकाणी नवीन जवाबदारी मिळेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास सफल होईल. आजचा शुभ रंग -पोपटी
तूळ राशी :-
विनाकारण खर्च होईल. जोडीदाराचे प्रेम मिळेल. वादविवादात पडू नका. आजचा शुभ रंग – नारिंगी
वृश्चिक राशी :-
शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात विचार करून गुंतवणूक करा तरच लाभ मिळेल. जुने मित्र भेटतील. रोजगारासाठी केलेले प्रयत्न सफल होतील. आजचा शुभ रंग – राखाडी
धनु राशी :-
अपेक्षा पूर्ण न झाल्याने चीडचीड होईल. कोर्ट कचेरीचे काम मार्गी लागेल. वाहन चालवताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग – केशरी
मकर राशी :-
मोठी अडचण दूर होईल. धोका पत्करू नका. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. आजचा शुभ रंग – निळा
कुंभ राशी :-
विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस. रागावर ताबा ठेवा. उत्पन्न वाढेल. आजचा शुभ रंग- पिवळा
मीन राशी :-
उत्पन्न स्थिर राहील. मन प्रसन्न राहील. कामासाठी प्रवास करावा लागेल. आजचा शुभ रंग – लाल
















