राशिभविष्य, सोमवार ३० मे २०२२ : सोमवार 30 मे 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
मेष :
धार्मिक कार्यात मन लागेल. सामाजिक कार्यात भाग घेण्याचा योग येईल. विचारपूर्वक खर्च करा.
वृषभ :
बाहेर जाण्याचा योग येईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. रागावर नियंत्रण मिळेल.
मिथुन :
कामात नवीन शिकायला मिळेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता असेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल.
कर्क :
घरात आणि कामाच्या ठिकाणीही तणाव असेल. उत्पन्न स्थिर राहील. धोका पत्करणे टाळा.
सिंह :
नोकरीच्या ठिकाणी अधिकार वाढतील. जुगार किंवा लॉटरीच्या फंदात पडू नका. काही अपेक्षित कार्यात विघ्न येऊ शकतात.
कन्या :
अतिरिक्त खर्च वाढेल. थकवा आणि चिंता वाढेल. उत्पन्न स्थिर राहील.
तूळ :
कामाच्या ठिकाणी चिंतेचे वातावरण राहील. व्यवहार करताना काळजी घ्या. धोका पत्करण्याची वेळ येईल.
वृश्चिक :
मनावर नियंत्रण ठेवा. कायदेशीर अडचणी दूर होतील. जोडीदाराचे प्रेम मिळेल.
धनु :
प्रयत्नांना यश मिळेल. मन समाधानी राहील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
मकर :
आरोग्यावर खर्च वाढेल. व्यवसायात स्थिरता प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी सहकर्मचार्यांचे सहकार्य लाभेल.
कुंभ :
शुभवार्ता मिळेल. घरात प्रसन्न वातावरण राहील. आत्मविश्वास वाढेल.
मीन :
व्यवहार लाभदायक ठरतील. मन प्रसन्न राहील. उत्पन्न वाढेल.