मेष : आजचा दिवस शुभ आहे. मानसिक गोंधळाला आवर घालावी.आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्दया संबंधी वरिष्ठांशी विचार – विनिमय होतील.
वृषभ : अडचणीतून मार्ग काढता येईल. समोरील गोष्टींचा आनंद घ्याल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. दूरचे प्रवास होतील. एखाद्या विषयात प्रगती होईल. संततीची प्रगती होईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
मिथुन : आज नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आजारपणात नवीन उपचारास सुरवात न केल्यास उत्तम. कौटुंबिक जबाबदारी ठामपणे पेलावीत. आत्मविश्वास कायम ठेवा. कामात घाई गडबड करू नका.
कर्क : मानसिक ओढाताण जाणवू शकते. ध्यानधारणेतून सकारात्मक ऊर्जा मिळवा.स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वाहन सौख्य लाभेल. प्रतिष्ठेस तडा जाऊ शकतो. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील.
सिंह : स्त्रियांना माहेरहून एखादी अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज उदासीनता व साशंकता अधिक प्रमाणात राहिल्याने मन उदास होईल. प्रकृती साधारण राहील. प्रयत्नांच्या मानाने यश कमीच मिळेल. योग साधनेकडे मन वळवावे. वैचारिक स्पष्टता ठेवा.
कन्या : विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. अचानक खर्च उदभवतील. बोलताना बौद्धीक चर्चे पासून दूर राहणे हितावह राहील. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. वेळच्या वेळी निर्णय घ्यावेत. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.
तूळ : मनाच्या दोलायमान अवस्थेतून बाहेर पडावे. उगाच चिंता करत बसू नका. वादाचे प्रसंग टाळावेत. चांगली संगत लाभेल.झोप पूर्ण न झाल्याने मानसिक ताण येईल. कौटुंबिक तसेच जमीन – जुमल्याच्या बाबतीत सावध राहावे लागेल.
वृश्चिक : मित्र व नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आर्थिक फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल. भावंडांकडून लाभ होतील. उगाचच चिडचिड करून चालणार नाही. मानसिक शांतता लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.
धनू : नवीन योजनांवर विचार करावा. जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा गोष्टी कराल. एकमेकातील वैचारिक दुरावा मिटेल. कुटुंबीयांशी गैरसमज झाल्याने मनस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. व्दिधा मनःस्थितिमुळे कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही.
मकर : नोकरी – व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल. प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. मान – सन्मान होतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. जोडीदाराशी मतभेद संभवतात. दिवस आळसात घालवून चालणार नाही. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.
कुंभ : तडकाफडकी कोणतीही कृती करू नका. मनातील नकारात्मक विचार काढून टाकावेत. नामस्मरण करणे हिताचे ठरेल.आर्थिक गुंतवणूक अयोग्य ठिकाणी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. कुटुंबियांशी पटणार नाही. गैरसमज, दुर्घटना यापासून जपून राहावे.
मीन : एखादी आनंददायी बातमी समजेल. पत्नी व संतती कडून लाभ होईल. अचानक धनप्राप्ती संभवत आहे. नवीन व महागडी वस्तू खरेदी करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.वाहन वेगावर मर्यादा घालावी. संयम सोडून वागू नका. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. अनावश्यक खर्च टाळावा.