राशिभविष्य, मंगळवार ३ मे २०२२ : आज अक्षय तृतीयेचा सण साजरा होत आहे. या दिवशी चंद्राची स्थिती अतिशय शुभ आहे. सूर्य मेष राशीत आहे आणि शनि महाराज कुंभ राशीत आणि गुरु मीन राशीत आहे.
मेष : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. व्यवसायात वाढ होईल.
सिंह : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
तूळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
वृश्चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
धनू : संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
कुंभ : जिद्दीने कार्यरत राहाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मीन : अचानक धनलाभाची शक्यता. महत्त्वाचे आर्थिक निर्णय पार पडतील.