राशीभविष्य, बुधवार २ फेब्रुवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?
मेष राशी :-
कार्य सिद्धीस गेल्याने तुम्हाला आनंद मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम कायम राहिल. आरोग्य उत्तम राहिल. कायदा पाळा. आजचा शुभ रंग – नारिंगी
वृषभ राशी :-
आज घराच्या कामात व्यस्त राहाल. मीडिया आणि आयटीचे लोकांना आजचा दिवस चांगला राहिल. लव्ह लाईफमध्ये तुम्हांला सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगलं राहिल. आजचा शुभ रंग – पांढरा
मिथुन राशी :-
आज तुमच्याकडे कामाचा भार होईल. सगळ्या कामांवर बारीक लक्ष असेल. वाद टाळा. जबाबदारीने वागा. आजचा शुभ रंग – हिरवा
कर्क राशी :-
राजकारणातील व्यक्तींना एखाद्या वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. अन्न दान करावे. आजचा शुभ रंग – आकाशी
सिंह राशी :-
देवदर्शनाचा लाभ मिळेल. अध्यात्माकडे कल राहील. विविध क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यांचा जरूर विचार करा. विचार करून कामे करा. आजचा शुभ रंग – गुलाबी
कन्या राशी :-
अनपेक्षित मोठा खर्च होण्याचे योग आहे. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. मौल्यवान वस्तू संभाळून ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. आजचा शुभ रंग – मोरपिशी
तूळ राशी :-
थकीत रक्कम परत मिळवण्यात यश मिळेल. प्रवासाचा योग आज निश्चित आहे. नातेवाईकांसोबत आनंदात वेळ जाईल. प्रेम संबंधात अनुकूलता राहिल. आज वाद टाळा. व्यवसाय चांगला चालेल. आजचा शुभ रंग – आकाशी
वृश्चिक राशी :-
वाहन चालवताना काळजी घ्या. अनोळखी व्यक्तीसोबत वाद निर्माण होऊ शकतात. प्रवासात सावध रहा. धावपळ चालू राहिल. आरोग्य खराब होऊ शकते. व्यापार, व्यवसायाच प्रगती होईल. मनोरंजन, आरामाची संधी मिळेल. आजचा शुभ रंग -गुलाबी
धनु राशी :-
धार्मिक कार्यात मन लागेल. उत्पन्नात वाढ होईल. कायदेशीर अडचनी दूर होतील. वाद विवादांना महत्व देऊ नका. लहानमोठ्या प्रवासाचे योग संभावतील. आर्थिक व्यवहारात सतर्कता बाळगा. व्यापार, व्यवसायात अनुकूल लाभ मिळेल. आजचा शुभ रंग – पिवळा
मकर राशी :-
रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध होतील. वेळ अनुकूल राहील. प्रयत्न करणं सोडू नका. यश मिळेल. स्थायी संपत्तीचे व्यवहार लाभदायी ठरतील. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आजचा शुभ रंग – जांभळा
कुंभ राशी :-
एखाद्या विशेष व्यक्तीबरोबर शाब्दीक वाद होऊ शकतात. आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. चिंता कायम राहील. व्यवसाय चांगला सुरू राहील. आजचा शुभ रंग – निळा
मीन राशी :-
करिअरमध्ये यशप्राप्तीमुळे प्रसन्न रहाल. छोट्या छोट्या गोष्टीचा तणाव कायम राहील. आजारी पडण्याची शक्यता. प्रेमप्रकरणात सकारात्मक परिणाम जाणवेल. नारंगी रंग शुभ आहे. आजचा शुभ रंग – सोनेरी