राशी भविष्य, सोमवार ३१ जानेवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?
मेष :-
माणसं ओळखायला शिका. शब्द जपून वापरणे हिताचे. नियोजन महत्त्वाचे हे लक्षात ठेवा. हुशारीने वागाल तर यशस्वी व्हाल. आजचा शुभ रंग – लाल
वृषभ :-
कला क्षेत्रातील लोकांची प्रगती होईल. मनपसंत कामं आवडीने करता येतील. दिवस आनंदात जाईल. वेळेचे आणि कामाचे नियोजन लाभाचे. आजचा शुभ रंग – निळा
मिथुन :-
हुशारीने मार्ग काढाल. माणसं जोडणं हिताचं. योग्यवेळी योग्य व्यक्तींची साथ घेणं हिताचं. महत्त्वाची कामं होतील. वाद टाळणं आणि शब्द जपून वापरणं हिताचं. आजचा शुभ रंग – हिरवा
कर्क :-
अडचणी दूर होतील. अनेक कामांसाठी लोकांचं सहकार्य लाभेल. दिवस चांगला जाईल. आजचा शुभ रंग – आकाशी
सिंह :-
वास्तवाचे भान राखणे आणि व्यवहार जपणे महत्त्वाचे. विचारपूर्वक वर्तन करणे हिताचे. नियम-कायदे पाळणे हिताचे. वाद टाळणे लाभाचे. आजचा शुभ रंग – नारिंगी
कन्या :-
दिवस चांगला आहे. अनेक कामं होतील. अडचणी दूर होतील. कौतुक होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. आजचा शुभ रंग – मोरपिशी
तूळ :-
नियम-कायदे पाळणे हिताचे तसेच वाद टाळणे लाभाचे. शब्द जपून वापरणे फायद्याचे. दिवस प्रगतीचा. नियोजनाच्या जोरावर प्रगती कराल. आजचा शुभ रंग – पांढरा.
वृश्चिक :-
नियोजन करणे हिताचे. प्रयत्नांमध्ये सातत्य राखणे हिताचे. तज्ज्ञांचा सल्ल्याचा लाभाचा. लोकांवर प्रभाव पाडू शकाल. आजचा शुभ रंग – गुलाबी
धनु :-
आत्मनिर्भर व्हा. बदल स्वीकारा. परिस्थितीशी हुशारीने जुळवून घ्याल. दिवस चांगला जाईल. आजचा शुभ रंग – सोनेरी
मकर :-
नव्या ओळखी होतील. अडचणी दूर करण्यासाठी ओळखीतील व्यक्तींची मदत घेणे हिताचे. आर्थिक नियोजन आणि कामाचे नियोजन लाभाचे. आजचा शुभ रंग – निळा
कुंभ :-
नेतृ्त्वाची संधी मिळेल. जबाबदारीने कामं करा. नियोजन हिताचे. कायदे पाळणे लाभाचे. वाद टाळणे फायद्याचे. आजचा शुभ रंग – काळा
मीन :-
नियम-कायदे पाळा. वाद टाळा. जपून आर्थिक व्यवहार करा. आर्थिक नियोजन महत्त्वाचे. आजचा शुभ रंग – पिवळा