मुंबई (वृत्तसंस्था) साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा?. हा जानेवारी महिन्यातील शेवटचा आठवडा असून, या आठवड्यात ग्रहांचे काही बदल पाहायला मिळतील. ग्रहांच्या या बदलाचा सर्व राशीवर परिणाम होईल. आर्थिक परिस्थिती कशी राहील, नफा होईल की तोटा हे जाणून घेण्यासाठी वाचा साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य
मेष राशी भविष्य : या आठवड्यात तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्याकडे कल राहील. मंगळवारी व्यवसायाची परिस्थिती अनुकूल राहील. नोकरीत चांगले यश मिळेल. संपत्तीचा विस्तार होण्याची शक्यता आहे. अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग – लाल.
वृषभ राशी भविष्य : या आठवड्यात नोकरीत नव्या जबाबदाऱ्या मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. सोमवारी अन्न दान करा. व्यवसायात चांगला लाभ होईल. या आठवड्याचा शुभ रंग – निळा.
मिथुन राशी भविष्य : बुधवार नंतरचा काळ तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. गुरुवारी व्यवसायात चांगली आणि मोठी संधी उपलब्ध होईल. मंगळवारी लाल वस्त्र किंवा अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग – हिरवा आणि पांढरा.
कर्क राशी भविष्य : हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध करुन देईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी आठवडा चांगला आहे. गुरुवार नंतर व्यवसायात चांगला फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. या आठवड्याचा शुभ रंग – पिवळा आणि पांढरा.
सिंह राशी भविष्य : मंगळवार नंतर मुलाच्या विवाहाशी संबंधित असलेले अडथळे दूर होण्यास सुरूवात होईल. आरोग्य चांगले राहील. मोठ्या भावाच्या सहकार्याने व्यापारात मोठा धनलाभ होईल. दररोज अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग – पांढरा.
कन्या राशी भविष्य : या आठवड्यात अनेक महत्वाच्या कामांना गती मिळेल. नोकरीत चांगले यश मिळेल. वरिष्ठांकडून चांगले मार्गदर्शन मिळेल. या आठवड्यात आरोग्य सुधारेल. व्यवसायाच्या संबंधित नवीन कामे या आठवड्यात सुरू होतील. विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या मार्गावरील अडथळे दूर होतील. या आठवड्याचा शुभ रंग – निळा आणि लाल.
तूळ राशी भविष्य : या आठवडयात नोकरीत बरी स्थिती राहील. व्यवसाय सुरळीत सुरू राहील. मंगळवार नंतर घर बांधण्याच्या संबंधित काम होईल. दररोज सकाळी पक्षांना दाणे, पाणी द्या. गुरुवार नंतरचा काळ तुमच्यासाठी खूपच चांगला आहे. या आठवड्याचा शुभ रंग – हिरवा.
वृश्चिक राशी भविष्य : नोकरीच्या संदर्भात तुम्ही आनंदी असाल. व्यवसायात देखील यश मिळेल. रविवारी गुळ दान करा. श्री गणेशाची पूजा करा. या आठवड्याचा शुभ रंग – पिवळा आणि निळा.
धनु राशी भविष्य : आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा आठवडा थोडा त्रासदायक असेल. गुरुवार नंतर व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. बुधवार नंतर नोकरीत प्रगती दिसून येईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील. मंगळवार नंतर सरकारी कामे पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करतील. या आठवड्याचा शुभ रंग – नारंगी, पिवळा.
मकर राशी भविष्य : मंगळवार ते शुक्रवार हा व्यवसायासाठी उत्तम काळ आहे. या आठवड्यात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार केले जातील. श्री गणेशाची पूजा करा. नोकरीत प्रगतीमुळे तुम्हाला आनंद होईल. या आठवड्याचा शुभ रंग – हिरवा.
कुंभ राशी भविष्य : नोकरी संदर्भात वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या स्वप्नातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न सुरू कराल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. शनिवारी तिळ दान करा. या आठवड्याचा शुभ रंग – निळा आणि केशरी.
मीन राशी भविष्य : या आठवड्यात व्यवसायात चांगले यश आणि नफा होईल. नोकरीतही चांगली प्रगती दिसून येईल. नव्या नोकरीची संधी चालून येईल. वायफळ खर्च टाळा. वाहन चालवताना काळजी घ्या. या आठवड्याचा शुभ रंग – नारंगी आणि पांढरा.