मेष : आज आपणास मोठा आर्थिक लाभ होईल. आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. आज आपले मन आनंदी राहील. जोडीदाराकडून प्रत्येक बाबतीत सहकार्य मिळेल. योजना यशस्वी होतील. मुलाच्या करिअरबाबत तुम्ही निराश होऊ शकता.
वृषभ : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यावसायिक स्थिती आपणास अनुकूल राहील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. सरकारी कामे पूर्ण होणार आहेत. नवीन करार होतील आणि कामे पटापट मार्गी लागतील. तुमचा मान-सन्मान वाढेल.
मिथुन : मनोरंजनात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसा खर्च होईल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. जिद्द व चिकाटी वाढेल. मुलाच्या शिक्षणात किंवा स्पर्धेत अपेक्षित यश न मिळाल्याने वाईट वाटेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील.
कर्क : आज अवैध व निषेधार्ह विचारां पासून दूर राहणे हितावह होईल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. त्यांच्या करिअरबाबत समाधानी असाल. सहलीला जाण्याचे बेत आखले जातील.
सिंह : आरोग्याच्या दृष्टीने आज आपण प्रसन्न व आनंदित राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. शिक्षण आणि स्पर्धेत विशेष यश मिळेल. डोळ्यांचे विकार होण्याची शक्यता आहे. विरोधक तुमचे नुकसान करू शकणार नाहीत.
कन्या : आज स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. मुलांकडूनही समाधानकारक आणि चांगली बातमी मिळेल. दुपारी कायदेशीर वादात तुम्ही जिंकू शकता. तुमची कीर्ती वाढणार आहे.
तूळ : आज आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे लेखन किंवा अन्य विधायक कार्य करण्यात आपण आघाडीवर असाल. नवीन परिचय होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेली व्यवहाराची समस्या दूर होऊन कामे यशस्वी होतील. हातात पुरेसा पैसा आल्याने आनंद मिळेल.
वृश्चिक : आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. स्वभावातील हट्टीपणा सोडल्यास अनेक समस्या सुटतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मन आनंदी व आशावादी राहील. दिवसभर व्यस्त राहतील. कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास डॉक्टरांकडे जावे लागेल.
धनु : आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. गुरूकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील. आज तुमची सरकारी कामे होणार आहेत. तसेच तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे. सासरच्या लोकांकडून भरीव रक्कम मिळू शकते.
मकर : आज वाद होण्याची शक्यता आहे. आज एखाद्या धार्मिक किंवा परोपकारी कार्यासाठी पैसा खर्च होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मानसिक स्वासथ्य व समाधान लाभेल. व्यवसायात प्रगती होईल.नवीन प्रयत्नांना यश मिळेल. काम करणाऱ्या लोकांकडून सहकार्य मिळेल.
कुंभ : आज आपले मन आनंदी राहील. मनात नकारात्मक विचार येतील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आर्थिक क्षेत्रात सुयश लाभेल. संघर्ष आणि विनाकारण शत्रुत्व येण्याची शक्यता आहे. विचार करून निर्णय घ्या.
मीन : आजचा दिवस कोणाशी आर्थिक व्यवहार करण्यास अनुकूल नाही. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आज नातेसंबंध बिघडू शकतात. धार्मिक ठिकाणी प्रवास होईल. धर्मादाय कार्यासाठी खर्च होईल.