मेष : बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळतील. कामाच्या व्यापामुळे कुटुंबियांना वेळ देऊ शकणार नाही. सरकारी कामात मात्र यश मिळेल. आज तुम्हाला इतरांची मदत केल्याने आराम मिळेल, ज्याचा भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
वृषभ : मुलांच्या बाजूने तुम्हाला काही समस्या असल्यास, आज तुम्ही तुमच्या वडिलांशी सल्लामसलत करून त्यावर उपाय काढू शकाल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. कुटुंबात तणाव राहील. नात्यात वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायाची स्थिती चांगली राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात आर्थिक यश मिळेल. संततीसाठी पैशांची गुंतवणूक करू शकाल.
मिथुन : शेजारी – पाजारी ह्यांच्याशी असलेले गैरसमज दूर होतील. वैचारिक बदल संभवतो. आर्थिक व्यवहारात मात्र सावधानता बाळगावी लागेल. डिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. आज कोणतेही काम नशिबावर सोडू नका. ते कठोर परिश्रमाने पूर्ण करावे लागतील, अन्यथा ते काम भविष्यात तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकते.
कर्क : आईसोबत मतभेद असू शकतात. असे झाल्यावर तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल. विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज करायचा असेल तर ते आजच करू शकतात. आज तुमचे थांबलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमच्या व्यवसायात वाढ होईल. मानसिक शांतता राहील, पण तरीही भावनांवर नियंत्रण ठेवा. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. निराशा व असंतोषाची भावना होईल.
सिंह : आज कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन घेऊ शकाल. परंतू वाणी व कृती ह्यावर नियंत्रण ठेवणे हितावह राहील. काही कारणाने आपल्या रागाचे प्रमाण वाढेल. आज कुटुंबातील स्त्रीकडून धनप्राप्ती होऊ शकते. आज नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. कुटुंबातील तरुण मुले आज तुमच्यासमोर काही मागण्या ठेवू शकतात, ज्या पूर्ण करण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न कराल.
कन्या : नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना आज उत्कृष्ट संधी मिळतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्हाला एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुमचे रखडलेले पैसे मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर ते तुम्ही आज परत करा. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अचानकपणे खर्च उदभवतील. शक्यतो भांडणा पासून दूर राहावे.
तूळ : मित्रांकडून फायदा होईल पण त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देऊन आपले मन प्रफुल्लित होईल. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुमचे पैसे नोकरीत अडकले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळतील. व्यवसायात काही नवीन संधी तुमच्या वाट्याला येतील, तुम्हाला त्या ओळखाव्या लागतील, तरच त्या तुम्हाला निकाल देऊ शकतील.
वृश्चिक : आज तुम्ही काही नवीन मित्र बनवू शकता आणि तुमचा सार्वजनिक पाठिंबा देखील वाढेल, परंतु तुम्ही सामाजिक कार्यक्रमांवर काही पैसे खर्च कराल. नोकरी – व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. व्यवसायात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या.
धनु : व्यापारी वर्गाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर तुमची कोणतीही प्रकरणे बऱ्याच काळापासून प्रलंबित असतील तर आज ती देखील अंतिम होऊ शकते. व्यवसायात नवीन करारांमधून प्रगतीची चिन्हे आहेत. आज मित्रांचे सहकार्य मिळेल. आज वाणीवर नियंत्रण ठेवा. शक्यतो नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. प्रतिस्पर्धी व विरोधक यांच्याशी संभाव्य वाद टाळा.
मकर : आज अचानकपणे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. हा खर्च आजारपणावर, व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळे होऊ शकतो. आज तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. तुमच्या व्यस्त दिवसातून तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढा. आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील.
कुंभ : प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची व नवीन वस्त्रपरिधान करण्याची संधी लाभेल. भागीदारीतून फायदा होईल. एखाद्या मित्राकडून व्यवसायाचा प्रस्ताव मिळू शकतो. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी, तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. कौटुंबिक व्यवसायासाठी जोडीदाराचा सल्ला प्रभावी ठरेल.
मीन : कामावर तुम्ही जितके जास्त कष्ट कराल तितके परिणाम मिळण्यास जास्त वेळ लागेल, पण निराश होऊ नका. जर तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली असेल तर ती आज तुम्हाला चांगला नफा देऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल.स्वभावातील तापटपणा संयमित ठेवावा लागेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी मिळेल.