मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चीक असणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वाढता खर्च तुमची डोकेदुखी ठरेल. नोकरीमध्ये स्वास्थ्य लाभणार आहे. अचानक समोर आलेल्या कामातून लाभ संभवतो. कामातील दिरंगाई टाळावी. प्रवास सुखकर होणार आहेत.
वृषभ : मोठ्या उद्दिष्टांचा पाठलाग करत असाल तर आज थांबा. जिद्द वाढणार आहे. मनोबलाच्या जोरावर कामे यशस्वी कराल. कोणत्याही आर्थिक बाबतीत विजय मिळाल्याने मन प्रसन्न राहिल. आत्मविश्वासपूर्वक वागाल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होतील. फसव्या मित्रांपासून सावध राहावे. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
मिथुन : कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करणार असाल तर एकदा कागदपत्रे तपासून घ्या. आज तुमचे कामामध्ये लक्ष लागणार नाही. एखादी मानसिक चिंता राहील. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज सावध राहावे लागेल. कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक कामास मात्र अनुकूलता लाभेल. प्रवासात भरकटू नका. वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या.
कर्क : उत्पन्नात वाढ झाल्याने तुमचे मन प्रसन्न राहिल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. भागीदारीमध्ये फायदा होईल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून लाभ मिळाल्याने आनंदी असाल. चिकाटी वाढणार आहे. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. कामाच्या ठिकाणी चिडचिड वाढू शकते. एकमेकांच्या सहकार्याने कामे करावीत. परदेशी कामातून लाभ संभवतो.
सिंह : आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. अनावश्यक कामात वेळ वाया जात असल्याने तुमची चिडचिड होणार आहे. व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य असेल. प्रवासात व वाहने चालवताना काळजी घ्यावी. एखाद्या मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल. शक्यतो अकारण होणारे गैरसमज टाळावे लागतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात.
कन्या : आज तुमचे नेतृत्त्व क्षमताही वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांबरोबर सुसंवाद साधाल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन आणि पगार वाढण्याची चांगली बातमी मिळेल. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. ति धाडस करायला जाऊ नये. स्वयं शिस्त पाळणे आवश्यक आहे.
तुळ : आज तुम्हाला जबाबदारीने काम करावे लागेल. तुमचे मन आनंदी राहील. आशावादीपणाने कार्यरत राहणार आहात. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचे विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे करू शकाल. आज उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. प्रवासाचे योग येतील. जोडीदाराला अचानक लाभ होईल. जवळच्या लोकांना दुर्लक्षित करू नका.
वृश्चिक : प्रवासादरम्यान तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकते. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रवास होणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामे पूर्ण करू शकाल. पैशाचे व्यवहार करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी यामुळे आर्थिक समस्या उद्भवतील. चिकाटी वाढेल. अनपेक्षित प्रवास संभवतात. दिवसभर कार्यरत राहावे लागेल. भाऊबंदकीत वाद संभवतात.
धनु : आजच्या दिवशी घरगुती बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याचा आहे. आर्थिक कामामध्ये सुयश लाभणार आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. कौटुंबिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. मुलांच्या गरजांकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल. काहींना गुप्त वार्ता समजतील. अपेक्षित पत्र व्यवहार होईल. आज मनाप्रमाणे वागण्याचे ठरवाल. खेळाडूंनी कसरतीत कसूर करू नये.
मकर : व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचा प्रभाव वाढणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. चिकाटीने कार्यरत राहाल. प्रवासाचे योग येतील. तुमच्या भावना एखाद्या जबाबदार व्यक्तीसमोर व्यक्त करण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल वाढेल. सध्याच्या परिस्थितीत बिनधास्त वागून चालणार नाही. अध्यापक वर्गावर जबाबदारी वाढू शकते.
कुंभ : आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम व्हाल. आज घरातून चांगली बातमी मिळेल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. काहींना नैराश्य जाणवेल. कामामध्ये चूक होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी स्वाभिमानाने भरलेला असेल. सावधानता हवी. प्रवास नकोत. आर्थिक व्यवहार आज नकोत. दूरच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. आततायीपणे वागून चालणार नाही.
मीन : आजचा दिवस तुमचा आत्मविश्वासाने भरलेला असेल. मित्र-मैत्रिणी भेटतील. नोकरीतील सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून मदत सहज मिळेल. मनोबल उत्तम राहील. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. थोडी आक्रमक भूमिका घ्याल. स्त्री वर्गावरून वादाचा प्रसंग येऊ शकतो.