मेष : उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. उत्साह व उमेद वाढणार आहे. मानसिक अस्वस्थता कमी होईल. गेले दोन दिवस रखडलेली कामे आपण पूर्ण करू शकणार आहात. आपल्या कामावर आपण आपले पूर्ण लक्ष केंद्रित करू शकणार आहात. कामात स्त्रियांची मदत मिळेल. बदलाला अनुसरून वागावे.
वृषभ : जोडीदाराशी क्षुल्लक कारणावरून मतभेद संभवतात. उगाच विरोध करत बसू नका. भागीदारीत अधिक लक्ष घालावे. नवीन वस्त्र खरेदी कराल. मानसिक त्रास संभवणार आहे. कामाचा त्रास वाढणार आहे. आपल्या कामाचे नियोजन आज कोलमडणार आहे. अनावश्यक कामात आपला वेळ वाया जाणार आहे. कामाचे योग्य नियोजन करावे. तरुणांना करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते.
मिथुन : क्षुल्लक मतभेद मनात धरून ठेवू नका. जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमच्या बौद्धिक क्षमतेचा कस लागणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आपल्याला अनुकूलता असणार आहे चांगले औद्योगिक वातावरण लाभेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.
कर्क : मनाची विशालता दाखवाल. मानसिक दोलायमानता जाणवेल. लिखाणात चांगली प्रगती करता येईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमच्या महत्त्वाच्या कामात तुम्हाला आज सुयश लाभणार आहे. आरोग्य उत्तम असणार आहे. जोडीदाराच्या स्वभावाची नवीन बाजू लक्षात येईल.
सिंह : सहकुटुंब बाहेर जाण्याचा बेत आखाल. शेअर्सच्या कामातून लाभ संभवतो. कामाचा ताण कमी होईल. सुखकारक वातावरणात काम करण्याची संधी मिळेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. हितशत्रुंवर मात करणार आहात. आरोग्य उत्तम राहील. पैज जिंकता येईल. धाडसाने कामे हाती घ्याल. मुलांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.
कन्या : जोडीदाराची कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. आकर्षणाला बळी पडू नका. प्रेमसौख्याला बहर येईल. तुमच्या मनोबलाच्या जोरावर तुम्हाला सुयश लाभणार आहे. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आता कमी होणार आहे. रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. आरोग्य उत्तम असणार आहे. उत्तम गृहिणीपदाचा मान मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल.
तूळ : नोकरांचे सुख चांगले राहील. दिवस काहीसा आळसात जाईल. मनोबल कमी राहील. कामामध्ये शिथिलता येणार आहे. काहींना कामाचा कंटाळा येईल. आरोग्याचा त्रास जाणवणार आहे. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी असणार आहे. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. नातेवाईकांची मदत घेता येईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.
वृश्चिक : कलेसाठी वेळ काढता येईल. गप्पा-गोष्टींची आवड पूर्ण कराल. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कामावर व तुमच्या बोलण्यावर आज सर्वजण खूश असणार आहेत. प्रवासाकरिता आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. जुगारातून लाभ संभवतो. निसर्ग सौंदर्यात रमून जाल. छंद जोपासायला वेळ काढता येईल.
धनू : कौटुंबिक काळजी लागून राहील. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. कामाची लगबग राहील. : खर्च वाढणार आहेत. तुमच्यावर कामाचा अनावश्यक ताण राहणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. कामे रखडण्याची शक्यता आहे. प्रवासात व वाहने चालविताना विशेष सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. उष्णतेचे विकार जाणवतील.
मकर : सामाजिक वादात अडकू नका. धार्मिक कामात सहभाग घ्याल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. कर्ज प्रकरणात सध्या अडकू नका. आपल्या बौद्धिक क्षमता सिद्ध होणार आहे. तुमचे व्यावसायिक अंदाज अचूक ठरणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. आरोग्य उत्तम राहील. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो.
कुंभ : कफाचा त्रास जाणवेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. कामाचा ताण कमी होईल. सुखकारक वातावरणात काम करण्याची संधी मिळेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. हितशत्रुंवर मात करणार आहात. आरोग्य उत्तम राहील. मदत करतांना मागे-पुढे पाहू नका. निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हाल. जवळचा प्रवास घडेल.
मीन : सर्वांशी लाघवीपणे बोलाल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. : आर्थिक कामे वेगाने पूर्ण होणार आहेत. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. तुमच्यावर असणारी जबाबदारी योग्यरितीने पार पाडाल. बौद्धिक चलाखी दाखवाल. शांत व विचारी निर्णय घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल.














