मेष : अचानक पैसे मिळल्याने तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. तुमची कामे मार्गी लागणार आहेत. आज कामाच्या ठिकाणी तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. कामाचा ताण कमी होईल.
वृषभ : लोकांकडून तुम्हाला प्रशंसा मिळेल. तुम्हाला आनंद वाटेल अशा गोष्टी करा. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. व्यवसायिक लोकांना नवीन कल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामे यशस्वी होणार आहेत. नोकरीत स्वास्थ्य लाभेल.
मिथुन : आज शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. व्यवसायात प्रगती होईल. मनोबल उत्तम राहील. नातेवाइकांच्या अनपेक्षित गाठीभेटी पडतील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. मालमत्तेशी संबंधित काही वाद असतील तर ते संपतील. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील.
कर्क : व्यवसायात नवीन योजना सुरु केल्याने कामाला आर्थिक गती मिळेल. मनोबल कमी राहणार आहे. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. नोकरी करणाऱ्या लोकांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. कठोर परिश्रम केल्याने मुलांना सन्मान मिळेल. कामाचा ताण राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. आरोग्य जपावे.
सिंह : आज तुमच्या सोबत काम करणारे अधिक त्रास देतील परंतु, नुकसान होणार नाही. मनोबल वाढेल. कामाचा ताण कमी राहील. आरोग्य सुधारेल. कामे मार्गी लागणार आहेत. व्यवसायात अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. स्वत:साठी आज तुम्ही वेळ काढाल. दैनंदिन कामे विनासायास मार्गी लागतील.
कन्या : तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारची निराशा संपेल. ज्यामुळे कामातील अडथळे आज दूर होतील. आरोग्य जपावे. मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. कौटुंबिक व्यवसायात वडिलांचा सल्ला फायदेशीर ठरेल. कामाचा ताण वाढेल. हितशत्रुवर मात करणार आहात.
तूळ : आज तुमच्यासाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. मनोबल उत्तम राहील. कामाचा ताण कमी होईल. आरोग्य सुधारेल. भविष्याची चिंता मिटेल. आज घरगुती गोष्टींकडे लक्ष द्याल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. अपेक्षित लाभ होतील.
वृश्चिक : अनेक प्रकारचे वाद आणि समस्या तुमच्या वाट्याला येतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. तुमचे कौशल्य कामात वापरुन समस्या कमी होतील. तुमचा वेळ तुम्ही धार्मिक आणि समाजिक कार्यात घालवाल. आरोग्य सुधारेल. आनंदी व आशावादी राहाल.
धनु : मित्रांच्या सोबत वेळ घालवल्याने तुम्हाला बरे वाटेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल. जिद्दीने कार्यरत राहाल. चिकाटी वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. मुलांशी संबंधित कोणताही निर्णय घेताना काळजी वाटेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. स्वास्थ्य लाभेल.
मकर : कुटुंबातील सदस्य आज तुमच्या कामामुळे आनंदी असतील. जोडीदाराकडून खूप प्रेम मिळेल. एखादी गुप्तवार्ता समजेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. तुमच्या व्यस्त जीवनशैलीतून तुम्ही जोडीदारासाठी वेळ काढाल. कामाचा ताण कमी राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. प्रवास टाळावेत.
कुंभ : तुमच्या बौद्धिक क्षमतेमुळे तुम्ही शत्रूचा नायनाट कराल. यश तुमच्या पायाखाली लोळेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. मानसिकता सकारात्मक राहील. कामाचा ताण राहिला तरी कामे मार्गी लावणार आहात. विरोधक तुमचा पाठलाग करतील. आरोग्य उत्तम राहील.
मीन : व्यापार आणि व्यवसायासाठी आजचा दिवस शुभ आहे. कोणतीही नवीन संधी सोडू नका. दैनंदिन कामे विलंबाने होतील. मनोबल कमी राहील. आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या प्रयत्नात असाल. प्रवास टाळावेत. काहींना अनावश्यक खर्च संभवतो. लाइफ पार्टनरसाठी भेटवस्तू खरेदी कराल. हितशत्रुंवर मात कराल.