मेष : आज मुलांच्या करिअरबाबतीत महत्त्वाचा निर्णय घ्याल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. तुमची कामे मार्गी लागणार आहेत. नवीन कामाची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी चांगले होईल. कामाचा ताण कमी होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात निष्काळजीपणा टाळावा, थोडी अधिक मेहनत करावी लागेल.
वृषभ : कामात शाहणपणा दाखवलात तर लवकर पूर्ण होईल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कामे यशस्वी होणार आहेत. परदेशी दौऱ्यावर जाण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. नोकरीत स्वास्थ्य लाभेल. आज तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांपासून खूप आराम मिळेल.
मिथुन : आज खाद्याशी विचारपूर्वक बोलावे लागेल. एखाद्या गोष्टीवरुन वाद होऊ शकतो. व्यवसायात प्रगती होईल. मनोबल उत्तम राहील. नातेवाईकांच्या अनपेक्षित गाठीभेटी पडतील. कामाच्या ठिकाणी कोणत्याही चुकीची पुनरावृत्ती टाळावी लागेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. आज तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला मदत कराल, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल.
कर्क : मुलांच्या भविष्याशी संबंधित काही योजना बनवण्याबद्दल जोडीदाराशी बोलू शकता. मनोबल कमी राहणार आहे. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. कामाचा ताण राहील. कुटुंबाप्रती तुमचे प्रेम आणि आपुलकी कायम राहिल. प्रवास शक्यतो टाळावेत. आरोग्य जपावे. आज तुमची फोनवर नातेवाईकांशी दीर्घ चर्चा होईल. आई तिच्या मुलांची आवडती डिश तयार करेल.
सिंह : व्यावसायिकांसाठी दिवस चांगला जाणार आहे. मनोबल वाढेल. कामाचा ताण कमी राहील. आरोग्य सुधारेल. कामे मार्गी लागणार आहेत. व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. दैनंदिन कामे विनासायास मार्गी लागतील. कुटुंबासोबत बाहेर जावेसे वाटेल. तुमच्या प्रियकरासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे.
कन्या : आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्य जपावे. मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. कामाचा ताण वाढेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीने आणि समर्पणाने तुमच्या वरिष्ठांची मने जिंकण्यात यशस्वी व्हाल. हितशत्रुवर मात करणार आहात. आज तुमचे मन धार्मिक कार्यात व्यस्त असेल, तुम्ही पूजेचा कार्यक्रम आयोजित करू शकता.
तूळ : व्यवसायाशी संबंधित काही योजना आखण्यात तुम्ही व्यस्त असाल. मनोबल उत्तम राहील. कामाचा ताण कमी होईल. आरोग्य सुधारेल. औद्योगिक बाबींना गती मिळेल, पार्टनरशिपमध्ये काम केल्यास फायदा होईल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. अपेक्षित लाभ होतील. आज ऑफिसमध्ये तुमच्या कामावर खूश असल्याने बॉस तुम्हाला बढती देण्याचा विचार करतील. आज तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार कराल.
वृश्चिक : तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्हाला फायदा होईल. चिंतेपासून सुटका मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. व्यवहाराच्या बाबतीत तुम्ही तुमचे मत लोकांसमोर स्पष्टपणे मांडाल, अन्यथा समस्या उद्भवतील. आरोग्य सुधारेल. आनंदी व आशावादी राहाल. कुटुंबातील सदस्याच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून तुम्ही अंतर ठेवावे.
धनु : जुन्या मित्रासोबत भेट होईल. ज्यामुळे आठवणी ताज्या होतील. जिद्दीने कार्यरत रहाल. चिकाटी वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. आज तुमचे काम कोणाकडूनही सहज करुन घेण्यात यशस्वी व्हाल. स्वास्थ्य लाभेल. आज तुम्हाला गरजू लोकांना मदत करण्याची संधी मिळेल. सोशल मीडियावर तुमची पोस्ट अधिक लोकांना आवडेल.
मकर : व्यवसायाशी संबंधित योजनांमध्ये घाई करु नका, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. एखादी गुप्तवार्ता समजेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आज तुम्हाला तुमच्या मुलांचे विचार जाणून घ्यावे लागतील. कामाचा ताण कमी राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. प्रवास टाळावेत. ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज एक मोठा करार मिळेल ज्यामुळे चांगला नफा मिळेल.
कुंभ : एखादी चांगली बातमी मिळाल्याने तुम्हाला फार आनंद होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. मानसिकता सकारात्मक राहील. कामाचा ताण राहिला तरी कामे मार्गी लावणार आहात. आयात-निर्यात व्यवसाय करणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगा, अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आरोग्य उत्तम राहील. आज तुम्हाला तुमच्या प्रियजनांकडून काही कामात मदत मिळेल ज्यामुळे काम सोपे होईल. राजकारणात तुमचा मान-सन्मान वाढेल.
मीन : कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. दैनंदिन कामे विलंबाने होतील. मनोबल कमी राहील. प्रवास टाळावेत. तुम्हाला तुमच्या मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील. काहींना अनावश्यक खर्च संभवतो. हितशत्रुवर मात कराल. मनोरंजन क्षेत्राशी संबंधित या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. घरातील कलह आज संपुष्टात येईल.