मेष : आज तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळणार नाही. मानसिक उत्साह विशेष असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. युवकांनी सोशल मीडियाचा वापर जरा जपून करावा. आपल्याला अपेक्षित असणारे फोन, ई-मेल येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला सुसंधी लाभणार आहे, प्रवास सुखकर होतील. घरासाठी काही आवश्यक वस्तू खरेदी कराल. जोडीदारासोबत फिरायला जाल. त्यामुळे मन शांत राहिल.
वृषभ : आज तुमच्या बॉसकडून तुम्हाला काही बोलणी ऐकावी लागू शकतात. आपले मनोबल उत्तम असणार आहे. कौटूंबिक वातावरण उत्साही व आनंदी राहील. आपल्याला आर्थिक लाभ होणार आहेत. काहींना गुप्तवार्ता समजतील. तुमच्या बोलण्यामुळे इतरांची मनं दुखावू शकतात. तुमच्यावर असणारा कामाचा ताण कमी होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामात आज यशस्वी व्हाल.
मिथुन : आज कामाच्या ठिकाणी सगळ्यांशी सलोख्याने वागा. आपला उत्साह वाढणार आहे. आपल्यावर कामाचा ताण राहील. आज आपण इतरांना सहाय्य करणार आहात. आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असणार आहे. तुमच्यावर असणारी जबाबदारी तुम्ही सहजपणे पार पाडणार आहात. कौटुंबिक वाद-विवाद संपतील. लहान मुलांसोबत वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात आदर वाढेल. तुम्हाला भेटवस्तू मिळतील.
कर्क : आज वाहन चालवताना थोडी काळजी घ्या. अपघात होण्यापासून सावध राहा. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहीजण धार्मिक कार्यात सहभागी होतील. दानधर्म कराल. विरोधक व हितशत्रुवर मात करणार आहात. आजचा दिवस जास्तीत जास्त तुमच्या कुटुंबियांबरोबर घालविण्याचा प्रयत्न करा. आज अकारण वादविवाद टाळावेत. प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्याबाबत जागरुक राहाल. कामाच्या ठिकाणी काही नवीन प्रकल्पांर काम कराल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
सिंह : आज तुमच्या प्रेमजीवनात गोडवा राहिल. प्रवासाची योजना कराल. काहींना विविध लाभ होणार आहेत. तुम्ही आपल्या सहकाऱ्यांशी सुसंवाद साधणार आहात. मुलांना शारीरिक समस्या जाणवतील. त्यामुळे सावधगिरी बाळगा. तुमचे मनोबल उत्तम राहील. आज तुमचे आर्थिक अंदाज अचूक ठरणार आहेत. वैचारिक परिवर्तन होईल. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी घाई कराल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना रोख रकमेची गरज भासेल.
कन्या : आज तुम्हाला व्यवसायाशी संबंधित अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. आपले मनोबल उत्तम असणार आहे. तुम्ही आपल्या विचारांवर ठाम असणार आहात. मानसिक प्रसन्नता राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. घरगुती बाबींमध्ये तुम्ही खूप आनंदी असाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आर्थिक फायदा होईल. वादामुळे कुटुंबात कटुता येईल त्यामुळे संयम राखा.
तुळ : आज तुम्ही तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आज आपण विशेष जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात. तुमचे मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. आज कामाच्या ठिकाणी अत्यंत संयमी वर्तन ठेवावं लागेल आणि सर्व काम नीट सौम्यतेने करावं लागेल. काहींना व्यवसाय किंवा नोकरीनिमित्त प्रवास करावा लागेल. नोकरी आणि कार्यक्षेत्रात अधिकाऱ्यांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. घरातील महत्त्वाची प्रलंबित कामे पूर्ण होतील.
वृश्चिक : आज तुमच्या सभ्यतेचा आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा कोणीही फायदा घेऊ शकतं. आपले मनोबल कमी असणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. आज तुमची अनावश्यक दगदग व धावपळ होईल. काहींना एखादा मनस्ताप संभवतो. आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. दैनंदिन कामात अनपेक्षित अडचणी जाणवतील. व्यवसायात सुधारणा कराल. ज्यामुळे प्रगतीच्या संधी सोबत आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेम जीवनासाठी वेळ मिळेल.
धनु : आज कामाच्या ठिकाणी मनासारखं काम न झाल्यामुळे अस्वस्थ वाटू शकतं. आरोग्य उत्तम राहील. आज तुम्ही इतरांना सहकार्य करणार आहात. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. पार्टनरशिपमधून सुरु केलेल्या व्यवसायाला चांगलं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स मिळतील. तुमचे मन आनंदी व आशावादी असणार आहे. सौख्य व समाधान लाभेल. जुन्या मित्रांशी बोलल्याने मानसिक शांती मिळेल. व्यवसायात काही शत्रू निर्माण होतील. ज्यामुळे अडचणीचा सामना करावा लागेल.
मकर : आळस आणि थकव्यामुळे आज कामात तुमचं मन रमणार नाही. आज तुम्हाला दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. काहींची चिडचिड होणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. आज आपल्याला प्रतिकुलता जाणवणार आहे. मनोबल कमी असल्याने कामे रखडणार आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे येतील. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. प्रेमसंबंध सुधारण्याची शक्यता आहे. व्यायाम केल्याने चांगले परिणाम मिळतील.
कुंभ : व्यापारात विश्वास ठेवताना जरा जपून ठेवा. कोणालाही पैसे देताना सावधानता बाळगा. तुमचे वैचारिक परिवर्तन होणार आहे. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. कुटुंबाची परिस्थिती चांगली असणार आहे. नातेवाईकांशी भेटीगाठी होतील. तुमच्या मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देणार आहात. काहींना अनपेक्षित धनलाभ होणार आहे. सामाजिक कार्य केल्याने तुमची कीर्ती वाढेल. वडिलांसोबतच्या नात्यात गोडावा राहिल. जीवनसाथीसोबत वेळ घालवाल.
मीन : आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्ही आपल्या कामामध्ये खुश राहणार आहात. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. प्रवास सुखकर होणार आहेत. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी होणार आहात. जोडीदाराचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे. कुटुंबातील खर्च वाढतील. वडीलधाऱ्यांशी तुमचे नाते सुधारेल.