मेष : नोकरी करणाऱ्यांना आज लाभ होईल. तसेच नोकरीच्या ठिकाणी नव्या संधी मिळातील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. मानसिकता सकारात्मक असल्याने आज आपण अनेक कामे मार्गी लावणार आहात. आजचा दिवस अत्यंत लाभदायक ठरणार आहे. प्रवास सुखकर होतील.
वृषभ : जे लोक गेल्या काही काळापासून आर्थिक संकट सहन करत आहेत. त्यांना अचानक धनलाभ होईल. खर्च वाढणार आहेत. कामाचा ताण जाणवणार आहे. मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. दूरचा प्रवास टाळा. नातेवाईक घरी येण्याची शक्यता आहे. आरोग्य जपावे. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी.
मिथुन : विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार महिलांना आज आनंदाची बातमी मिळू शकते. नवे स्नेहसंबंध जुळतील. नवीन परिचय होतील. तुमचा अनेकांशी सुसंवाद राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. वायफळ खर्च अधिक होण्याची शक्यता आहे. नात्यातील दुरावा दूर होण्याची शक्यता आहे. बौद्धिक परिवर्तन झाल्याने तुम्हाला विशेष उत्साही वाटेल.
कर्क : आज वायफळ खर्च अधिक होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन रमेल. आईवडिलांच्या सेवेत दिवस जाईल. कामाचा ताण कमी होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. कुणाच्याही सांगण्यावर जाऊन नका. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करा. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल.
सिंह : बँकेसंबंधित व्यवहार करताना काळजी घ्या. करिअरमध्ये मोठे बदल होतील नव्या लोकांच्या भेटी होतील. मनोबल उत्तम असणार आहे. स्वास्थ्य लाभेल. प्रवासाकरिता आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. कामाचा ताण कमी राहील. आर्थिक प्रकरणात आर्थिक सल्लागाराचा सल्ला ग्या. ऑफिसमधील आव्हानांचा सामना करावा लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अनुकूलता लाभणार आहे.
कन्या : व्यापारात कुणावरही विश्वास ठेवू नका. महत्त्वाची कामे स्वत: करा. वडिलोपार्जित संपत्तीचं प्रकरण एकदाचं मिटेल. आर्थिक लाभ होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांबरोबर सुसंवाद राहील. नोकरी व्यवसायात आज बिनसण्याची शक्यता आहे. तर उद्योगात नफा होण्याची शक्यता आहे. स्वास्थ्य व समाधान लाभेल.
तुळ : चर्चेतून रिलेशनशीपमधील वाद सोडवा. तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ देऊ नका. कामाचा ताण कमी होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आज तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. करिअर घडवण्यासाठी नवी रणनीती तयार करा. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक : तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. पण अचानक खर्चही वाढेल. मोठी रक्कम उधार देणं टाळा. मालमत्तेशी संबंधित वाद सुटण्याची शक्यता आहे. मनोबल कमी असणार आहे. खर्च वाढणार आहेत. मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. संयम बाळगा. समजूतदारपणे निर्णय घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी.
धनु : प्रोफेशनल लाईफमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. भावूक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. पार्टनरशिपच्या व्यवसायात फायदा होईल. मनोबल उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात. खरेदी करण्याचा योग आहे. त्यामुळे पैसा खर्च होईल. मित्रांसोबत गप्पांचा फड रंगेल. प्रवासाचे योग येतील. आर्थिक लाभ होतील.
मकर : केवळ मेसेजवर बोलत बसू नका. आज तुम्ही पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी डेटवर घेऊन जाल. पार्टनरला सरप्राईज गिफ्ट द्याल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. काहींना आपण करत असलेल्या कामासाठी उचित मान-सन्मान लाभेल. पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये आज संतुलन ठेवा. तुमच्या करिअरच्या गोल्सवर फोकस ठेवा. प्रवास होतील.
कुंभ : करिअरमध्ये थोडा डिस्टर्बन्स असेल. ऑफिसच्या कामात आव्हानांचा सामना करावा लागेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. अस्वस्थता कमी झाल्याने तुम्ही तुमच्या कामावर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करू शकणार आहात. आजचा दिवस संमिश्र असा जाईल. रिलेशनशीपमध्ये थोड्या कुरबुरी होतील. पण पार्टनरची काळजी घ्या. तुमच्या कार्यक्षेत्रात उचित संधी लाभेल.
मीन : जीवनसाथीची भक्कम साथ मिळेल. कौटुंबिक जीवनात सुखशांती मिळेल. शेतातील कामे मार्गी लागतील. मनोबल कमी असणार आहे. काहींना एखादी मानसिक विवंचना राहणार आहे. आपल्या हातून एखादी चूक होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. आज आयुष्यात खास व्यक्तीचा प्रवेश होणार आहे. नवविवाहितांचं गंगेत घोडं न्हाणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी.