मेष : मेष राशीच्या लोकांच्या घरात प्रेम आणि समजूतदारपणा पाहायला मिळेल. तुम्ही एखाद्या प्रकल्पाच्या संशोधनावर काम करू शकता. भागिदारीतून अपेक्षित लाभ होईल. थोडीफार खरेदी केली जाईल.
वृषभ : लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस सुखकर राहील. विरोधकांचा विरोध मावळेल. कामातून समाधान लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल.
मिथुन : बौद्धिक चर्चेत भाग घ्याल. आपल्याच मतावर अडून राहू नका. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.मिथुन राशीच्या लोकांनी आज स्वतःसाठी वेळ काढला तर चांगले होईल. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस शुभ आहे.
कर्क : कुटुंबातील एखादा सदस्य तुमची प्रतिष्ठा वाढवेल. प्रगतीसाठी नवीन मार्ग आणि पर्याय शोधणे आवश्यक आहे. प्रॉपर्टी डीलरसाठी आजचा दिवस अधिक फायदेशीर आहे. जोडीदाराचे मत विचारात घ्या. गनीमी काव्याचा वापर कराल. संयमाने काम साधावे लागेल.
सिंह : आज इतरांना दिलेले पैसे परत मिळू शकतात. अनावश्यक खर्चात कपात करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुकूल बदल होऊ शकतात. तुमच्या इच्छाशक्तीची चांगली मदत मिळेल. मनावरील चिंतेचे मळभ दूर होईल.
कन्या : आर्थिक बाबी तुमच्या बाजूने सोडवता येतील. वडिलधार्यांनी दिलेल्या सूचना आज तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. कौटुंबिक कामात लक्ष घालावे लागेल. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल.
तूळ : विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांची मदत मिळेल. एखाद्यावर जास्त विश्वास ठेवल्याने तणाव निर्माण होऊ शकतो. मनात विशिष्ट हेतु घेऊन काम कराल. दिवस धावपळीत जाईल. हातातील कामात यश येईल.
वृश्चिक : झटपट पैसे मिळवण्यासाठी चुकीच्या योजनेत भांडवल गुंतवणार नाही याची काळजी घ्या. अभ्यासात तुमची कामगिरी चांगली राहील. उत्तराला प्रत्युत्तर द्याल. कर्जाची प्रकरणे हातावेगळी करावीत. शक्यतो कोणालाही उधार देऊ नका.
धनु : काही नवीन काम सुरू करण्याचा निर्णय घ्याल. तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला कोणाची मदत मिळू शकते. उधारीच्या रकमेच्या वसुलीसाठी काळ अनुकूल आहे. माणसामाणसातील फरक ओळखावा. मनातील इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस अपेक्षित लाभ देणारा ठरेल.
मकर : रिअल इस्टेटमध्ये गुंतलेले लोक सवलत देऊ शकतात. पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात यश मिळू शकते. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. व्यवसायात कोणतेही बदल करण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. दान-धर्म करण्याचा विचार कराल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. तुमच्या ज्ञानात भर पडेल.
कुंभ : ऑनलाइन व्यवसाय करत त्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना आखल्या पाहिजेत. रखडलेली योजना पुन्हा सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. नवीन मित्र जोडावेत. व्यावसायिक गोष्टीवर अधिक भर द्याल.
मीन : नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधीही मिळू शकतात. सामाजिक आघाडीवर नेटवर्किंग फायदेशीर ठरेल. खोट्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. कोणताही व्यवहार करताना सावधानता बाळगावी. आततायीपणा आड येऊ देऊ नका.