मेष : आज कुटुंबात व कामाच्या ठिकाणी समजूतदारपणाने व्यवहार केल्याने संघर्ष टळतील. वाणीवर नियंत्रण न राहिल्याने कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. स्त्रियांकडून फायदा होईल. वागण्या-बोलण्यात काहीसा हटवादीपणा येईल. कामात गतीमानता येईल. स्वत:बद्दलच्या नसत्या कल्पना बाजूला साराव्यात. बुद्धिचातुर्याने कामे कराल. परिस्थितीनुरूप वागणे ठेवाल.
वृषभ : आज खंबीर विचारांमुळे आपण सावधपणे काम कराल. आर्थिक विषयांचे योग्य नियोजन कराल. आपली कलात्मक जाण वाढीस लागेल. वस्त्रे, अलंकार, सौंदर्य प्रसाधने व मनोरंजनावर खर्च होईल.वागण्यात कर्मठपणा आणाल. वडीलांचा मान ठेवून निर्णय घ्यावा. प्रगल्भतेने वागणे ठेवाल. न्यायी वृत्तीने मत मांडाल. नवीन विचार आत्मसात करावेत.
मिथुन : आज आपली वाणी किंवा व्यवहार इतरांशी गैरसमज निर्माण करू शकतात. कुटुंबीय व सगे – सोयरे यांच्याशी वागताना खूप सांभाळून राहावे लागेल. आजार किंवा दुर्घटना होण्यामुळे ते संबंध सांभाळा. मान – प्रतिष्ठेची हानी होईल. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. आरोग्याची काळजी घ्यावी. अति विचार करू नका. अचानक धनलाभ संभवतो. मनातील आकांक्षा पूर्ण होईल.
कर्क : आजचा दिवस आर्थिक नियोजन व नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम आहे. उद्योग – व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नाच्या मार्गांत वाढ झाल्याने आपणाला खूप आनंद व समाधान वाटेल. शांत व संयमी विचार कराल. वैचारिक आधुनिकता ठेवावी. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. भावंडांना मदत कराल. घराची सजावट कराल.
सिंह : आजचा दिवस नोकरी – व्यवसायात लाभदायी व यशदायी आहे. आपल्या कार्य क्षेत्रात वर्चस्व मिळवाल व प्रभाव पाडाल. पुरेपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यामुळे आपली कामे सहजपणे पार पडतील. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामाची कदर करतील. पदोन्नतीची शक्यता आहे. चुकीच्या लोकांमुळे मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. परिस्थिती जाणून योग्य मार्ग काढावा. सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात. वाताचे विकार बळावू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढवू नका.
कन्या : आजचा दिवस आपला परोपकारी कार्यात खर्च होईल. एखाद्या प्रवासात संवाद साधण्याची संधी मिळेल. परदेशगमनाचे योग येतील. भावंडांकडून लाभ होईल. कार्यालयात वरिष्ठांपासून सांभाळून राहा. आर्थिक लाभ होईल. मनातील नसते संशय काढून टाकावेत. अत्यंत व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. आपल्या बुद्धिमत्तेचा सदुपयोग करावा. दीर्घकाळ चिकाटीने कामे कराल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
तूळ : आजचा दिवस अचानक धनलाभाचा आहे. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरीही नवे कार्य हाती घेऊ नका. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. हितशत्रू आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. घरगुती कामात अधिक कष्ट पडू शकतात. आपल्या गृहसौख्याकडे अधिक लक्ष द्यावे. हातातील कामात यश येईल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. प्रवासात वाहन जपून चालवावे.
वृश्चिक : आज दैनंदिन घटनाक्रमात बदल होईल. आज आपण मौज- मजा व मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. मित्र व कुटुंबीयांची त्यात साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात मान – प्रतिष्ठा वाढेल. नवीन वस्त्र प्रावरणे व वाहन सुख मिळेल. भागीदारीत लाभ होईल. काही गोष्टींचा अधिक खोलवर विचार करावा. धैर्याने कामे हाती घ्याल. व्यवसायात चांगली आर्थिक कमाई होईल. हातात काही नवीन अधिकार येतील. कौटुंबिक खर्चाचा ताण राहील.
धनू : आजचा दिवस आर्थिक व व्यापारी नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. कार्ये यशस्वी होतील. आज परोपकाराची भावना प्रबळ होईल. आजचा दिवस आनंदात व्यतित होईल. काही बदल जाणीवपूर्वक करावेत. नसत्या वादात अडकू नका. निराशेच्या आहारी जाऊ नये. घराची कामे सुरळीत पार पडतील. स्वबळावर कामे उरकाल.
मकर : आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज बौद्धिक कामे व व्यवसायात आपण नवी विचार प्रणाली अंमलात आणाल. लेखन व साहित्य क्षेत्रात आपली सृजनात्मकता दिसेल. तरीही मनाच्या एका कोपर्यात अस्वस्थता जाणवेल. जुन्या गोष्टींचा आधार घेणे टाळावे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कामातील अडथळे प्रयत्नाने दूर करावे लागतील. छुप्या शत्रूंची डोकेदुखी वाढेल. हातातील अधिकार वापरावेत.
कुंभ : आज नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज उद्वेग व क्रोध आपल्या मनात जागा घेईल. खर्च वाढेल. बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील. स्वास्थ्य खराब होईल. उगाचच कोणाशीही वैर पत्करू नका. काही कारणाने घरापासून दिवसभर दूर राहावे लागेल. गप्पांची मैफल जमवाल. तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.
मीन : आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्यांना भागीदारीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पति – पत्नी वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. मित्र, स्वजन ह्यांचा सहवास घडेल.कामाचा योग्य आढावा घ्यावा. मानसिक ताण जाणवेल. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. मानापमान फार मनावर घेऊ नका. आपले स्वत्व गुण राखून वागाल. (Today Rashi Bhavishya, 1 March 2023)
















