साप्ताहिक राशिभविष्य, २७ मार्च ते २ एप्रिल २०२२ : मार्चचा शेवटचा आठवडा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. या आठवड्यात प्रेम, नातेसंबंध आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र मकर राशीतून कुंभ राशीत जाईल, जिथे देवगुरु बृहस्पती देखील विराजमान आहे.
मेष :-
सप्ताहाची सुरुवात व्यावसायिकांचं नवं पर्व सुरू करणारी. सप्ताहातील शनी-शुक्र सहयोग रेंगाळलेले खरेदी-विक्रीचे व्यवहार करवून देईल. कृत्तिका नक्षत्राचं नैराश्य जाईल. भरणी नक्षत्रास अमावास्येचं फिल्ड मानवी दहशतीतून त्रासाचं. वाहनं सांभाळा.
वृषभ :-
सप्ताहातील ग्रहमानाचा चातुर्याने लाभ घ्या. ता. २८ व २९ हे दिवस दुर्मीळ ग्रहयोगांचे. कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रम यशस्वी होतील. सप्ताह तरुणांना धार्जिणाच! यंदाचा गुढीपाडवा एखाद्या मोठ्या यशातून गुढी उभारेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे धनलाभ. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत पगारवाढ होईल.
मिथुन :-
सप्ताहात कोणताही शॉर्टकट मारू नका. स्त्रीचा मोहजाळ टाळा. अर्थात, स्त्रियांनी पुरुषांचासुद्धा मोहजाळ सांभाळावा. बाकी आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना रवी-बुध सहयोग कलागुणांतून प्रकाशात आणणारा. ता. २९ व ३० हे दिवस सुवार्तांतून फ्लॅशन्यूज देणारे. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना गुढीपाडवा घरात आनंदोत्सवाचा!
कर्क :-
आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शनी-शुक्र सहयोग काही अफलातून लाभ देईल. जुन्या गुंतवणुकींतून लाभ. पुत्रोत्कर्ष धक्का देईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या घबाडयोगाची. एखादी ग्रासलेली चिंता जाईल. यंदाचा गुढीपाडवा वास्तुयोगाचा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशात लाभ.
सिंह :-
सप्ताहातील शनी-शुक्र सहयोग एखादी स्त्रीचिंता देऊ शकतो. सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना उत्तमच राहील. रेंगाळलेले वास्तुविषयक व्यवहार होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ व ३० हे दिवस गतिमान राहतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येचं फिल्ड हातापायाच्या दुखापतींचं. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशात भाग्योदय.
कन्या :-
सप्ताहातील दुर्मीळ ग्रहयोगांचा लाभ घेणारी रास. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती गुढीपाडव्याजवळ चांगलीच गुढी उभारतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार सतत सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवेल. घरातील तरुणांचे भाग्योदय. यंदाचा गुढीपाडवा नोकरीत स्थिरस्थावर करेल. कर्जमंजुरी.
तूळ :-
शनी-शुक्र सहयोगाचा एक अंडरकरंट राहील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचं पूर्वसंचित फळाला येईल. ता. २८ ते ३० हे दिवस धनवर्षाव करणारे. घरातील तरुणांचे विवाह ठरतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार नोकरीत भाग्याचा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुढीपाडवा पर्यटनाचा.
वृश्चिक :-
सप्ताह ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी आश्वासक फळं देईल. ता. २८ ते ३० हे दिवस एकूणच आपल्या राशीस भाग्यबीजं पेरणारे ठरतील. यंदाचा गुढीपाडवा अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट यशातून मोठा जल्लोषाचा. पुत्रोत्कर्षातून आनंदाश्रूंचा. सहकुटुंब मौजमजा.
धनू :-
सप्ताहातील शनी-शुक्राचा सहयोग आणि पाडव्याजवळील रवी-बुध युतियोग मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना घरगुती सुवार्तांतून प्रसन्न ठेवेल. तरुणांना गुढीपाडवा नोकरी मिळाल्याचा आनंद साजरा करेल. पूर्वाषाढा नक्षत्राचा व्यावसायिक शुभारंभ होईल. उत्तरा नक्षत्रास ता. ३० व ३१ हे दिवस कर्जमुक्तीचे.
मकर :-
सप्ताहात शनी-शुक्र सहयोग पूर्णपणे अंमल करेल. विशिष्ट कायदेशीर कटकटी संपतील. श्रवण नक्षत्रास ता. २८ व २९ हे दिवस नोकरीतील घडामोडींतून मोठे प्रसन्न ठेवतील. यंदाचा गुढीपाडवा उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना मानसन्मानाचा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या खर्चाची. वाहनपीडा.
कुंभ :-
सप्ताह बुद्धिजीवी मंडळींना छानच. ता. २९ ते ३१ हे दिवस विशिष्ट आर्थिक पेचप्रसंग सोडवणारेच. यंदाचा गुढीपाडवा तरुणांचं भाग्य उजळविणारा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी बहुमान मिळेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना गुढीपाडवा व्यावसायिक गुढी उभारणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी मिळेल.
मीन :-
सप्ताहातील एक अतिशय लाभसंपन्न ठरणारी रास राहील. राशीतील रवी-बुध आणि शनी-शुक्र सहयोग व्यावसायिक उत्तम उलाढाली करतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात गुप्तचिंता घालवेलच. उद्याचा सोमवार मोठ्या प्रसन्नतेचा. उत्तराभाद्रपदा नक्षत्रास गुढीपाडवा प्रसिद्धीयोगाचा. विवाहाचा निर्णय घ्याल.
















