एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील नागदुली येथे दुपारी अडीच ते तीन वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून ९० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे.
नागदुली येथील योगेश यादव कोळी यांचे गावाबाहेरील एरंडोल ते म्हसावद रस्त्याला कटलरीचे दुकान व पिठाची गिरणी आहे. योगेश व त्यांची पत्नी हे दुकानावर गेले होते, तर त्यांचा मुलगा व मुलगी घरासमोर अंगणात खेळत होते. या वेळी अज्ञात चोरट्याने या संधीचा फायदा घेत त्यांच्या उघड्या घरात प्रवेश करुन ९० हजारांची रोकड लंपास केली.
रात्री ९ वाजता कोळी हे दुकान बंद करून घरी परतल्यावर चोरी घडना उघड झाली. तर घराच्या मागील बाजूस नाल्यात पैसे असलेला करत आहेत. स्टीलचा डबा आढळला. या प्रकरणी योगेश कोळी यांच्या फिर्यादीवरुन एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पो. नि. सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील व जुबेर खाटीक तपास करीत आहेत.