मुंबई (वृत्तसंस्था) कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कारवाई करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे आरोप सुरू असून त्यामुळे आता वानखेडे यांच्या एकूण संपत्तीची माहिती आता समोर आली आहे. तर जाणून घ्या, समीर वानखेडे यांच्याकडे एकूण मालमत्ता किती आहे?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे दरवर्षी त्यांच्या मालमत्तेची माहिती संबंधित विभागासमोर नियमानुसार सादर करतात.
समीर वानखेडे यांच्या मालमत्तेची यादी
– समीर वानखेडे यां च्याकडे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात ४ एकर जमीन आहे (ही मालमत्ता त्यांच्या वडिलोपार्जित मालकीची आहे)
– २००४ मध्ये वानखेडेची आई जाहीदा वानखेडे यांनी समीर वानखडे यांना (मुंबईत) यांच्या नावे ८०० चौरस फुटांचे घर दिले. आई जाहिदा वानखेडे यांच्या नावावर एक फ्लॅट नवी मुंबईत आहे, जो १९९९ साली घेतला होता. (हा फ्लॅट सुमारे ७०० चौरस फूट आहे)
– समीरच्या मावशीचा कर्करोगाने मृत्यू झाला होता, त्यांना मुलबाळ नाही, त्यामुळे त्यांनी त्यांचे सुमारे १००० चौरस फुटांचे अंधेरीतील कार्यालय समीर वानखेडे (मुंबईत) यांना दिले.
– नवी मुंबईत एक भूखंड आहे जो भाड्याने देण्यात आला आहे, हा भूखंड १९९५ मध्ये घेण्यात आला असून तो सुमारे ११०० चौरस फूट आहे.
– समीर वानखेडे यांनी २०१६ मध्ये सुमारे ११०० चौरस फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट घेण्यासाठी पैसे कुठून आले? क्रांती रेडकर यांनी त्यांचा म्हाडाचा फ्लॅट विकला. वडिलांच्या पेन्शनचे पैसे आईच्या मृत्यूनंतर एलआयसीचे पैसे मिळाले आणि २०१६ ते २०२१ पर्यंतच्या पगाराचा काही भाग.
– याशिवाय नवाब मलिक यांनी सांगितलेले घड्याळ (सीमास्टर) त्यांच्या आईने २००५ साली सुमारे ५५००० रुपयांना विकत घेतले आणि समीर वानखेडे यांना भेट म्हणून दिले. त्यावेळी समीर वानखेडे यांची पहिली सरकारी नोकरी केंद्रीय पोलीस संघटनेची होती.
– शूज आणि कपड्यांबद्दल बोलायचे झाले तर, ही सर्व खरेदी अंधेरी लोखंडवालाच्या सामान्य दुकानातून झाली आहे.
कोण होत्या जाहिदा वानखेडे?
जाहिदा वानखेडे या समीर वानखेडे यांच्या आई आहेत. ज्यांचे २०१५ मध्ये निधन झाले, जाहिदा एक व्यापारी होत्या आणि त्यांचा भंगार व्यापाराचा व्यवसाय होता. समीर वानखडेच्या आईची आई दुर्गा यांच्या नावाने एक एनजीओ होती तसेच याशिवाय त्या अनाथालय ही चालवत होत्या.