जळगाव (प्रतिनिधी) दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्रेमनगर, जळगाव या विद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक श्री.ऋषिकेश पाटील यांची राजस्थान येथील बिकानेर नोखा येथे होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
राजस्थानमध्ये इंडियन सायन्स टेक्नो फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक ऋषिकेश पाटील यांची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे. ते दि.11 व १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सादरीकरण करतील. त्यांना मुख्याध्यापक डी.एस. पाटील, पर्यवेक्षक डी.बी. सोनवणे, कनिष्ठ विभागप्रमुख गजेंद्र पाटील, विज्ञान मंडळ प्रमुख पी.एस. महाले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्था अध्यक्षा रत्नाताई जैन, सचिव अशोककुमार खिवसरा, कोषाध्यक्ष डॉ.प्रमोद खिवसरा, सदस्य डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, डॉ.विनोद जैन, सुरेश लोढा, शालेय समिती सदस्या साधना शर्मा, सदस्य अविनाश जोशी यांनी कौतुक केले आहे.