नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहारच्या जमुईमधील एक लग्न सध्या चर्चेचा विषय (Viral Wedding Story) ठरलं आहे. यात एका पतीनं स्वतःच आपल्या पत्नीचं तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिल आहे. ज्यावर त्याची पत्नी लग्नाच्या आधीपासूनच प्रेम करत होती (Man Gave Divorce to Wife to Let Her Marry With Lover). ही घटना लोकांना हम दिल दे चुके सनम (Hum Dil De Chuke Sanam) सिनेमाची आठवण करून देत आहे.
१९९९ चा बॉलिवूड चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’ च्या कथेशी हे प्रकरण जोडले जात आहे, ज्यामध्ये अभिनेता अजय देवगणला त्याची पत्नी ऐश्वर्या रायचं बॉयफ्रेंड सलमान खानशी लग्न करून द्यायचं होतं, मात्र चित्रपटात तसे होऊ शकलं नाही. व्हिडिओमध्ये विकास त्याच्या पत्नीचे तिच्या बॉयफ्रेंडशी स्वतःच्या इच्छेने लग्न करण्याविषयी बोलत आहे. त्याचवेळी, फोटो पाहिल्यानंतर शिवानीच्या प्रेमप्रकरणाची माहिती झाल्याचंही तो म्हणत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, शिवानीचे लग्नापूर्वी सचिनसोबत अफेअर होते. विकास हा जमुई जिल्ह्यातील सोनो पोलीस स्टेशन हद्दीतील बलथर गावचा रहिवासी आहे.
शिवानी कुमारी या जमुईच्या खैरा पोलीस स्टेशन हद्दीतील दानसिंगडीह गावातील रहिवासी आहेत. विकासच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दोन वर्षांपूर्वी त्याने शिवानीशी लग्न केलं होतं. शिवानीवर पूर्वीपासून प्रेम करणारा सचिन हा मुलगाही जमुई जिल्ह्यातील झझ पोलीस स्टेशन हद्दीतील काबर गावचा रहिवासी आहे. लग्नानंतर विकास शिवानीसोबत बंगळुरूमध्ये राहत होता. येथे तो एका खासगी कंपनीत काम करतो. एक दिवशी विकासला कळाले की शिवानी आपल्या प्रियकराला भेटते, तेव्हा त्याने दोघांनाही बसवले आणि समजावले आणि दोघांनी पुन्हा भेटायचं नाही असं सांगितलं.
विकास आणि सचिनमध्ये अनेक भांडण आणि मारामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण तरीही शिवानीने सचिनला भेटणे थांबवलं नाही. त्यानंतर विकासनं दोघांमधील प्रेम बघून समजूदारपणा दाखवला आणि आपल्या पत्नीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न लावून देण्याचा विचार केला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तिचा बॉयफ्रेंड शिवानीच्या डोक्यामध्ये कुंकू भरत आहे. यावेळी विकासही तेथे उपस्थित होता. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.