चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यात सवत्र ठिकाणी रात्री विजांचा कडकडाट,वादळासह गारासह अवकाळी पावासाने तालुक्यात बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दि. 26 फेब्रुवारी रोजी रात्री दहा ते साडे दहा या दरम्यान अचानक विजांचा कडकडाट,वादळासह गारांचा पाऊस पडला. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्याचा शेतात काढणीस आलेल्या हरभरा,गहू, मका, बाजरी, दादर,पपई, डांगर, टरबूज, केळी अश्या पिकांचे नुकसान मोठया प्रमाणात झाले आहे. तालुक्यात अंदाजे शेकडो हेक्टरचे नुकसान झाले आहे.
अवघ्या पंधरा दिवसात येणारे पीक सुद्धा जमीनदोस्त होऊन गेल्यामुळे शेतकरी अहवालदिल झाला आहे अनेक शेतकरी शेतात पिकं पाहून ठसा- ठसा रडत आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे, इकडे खरीप पिकांचे नुकसान होवून विमा भरपाई नाही, अफाट उत्पादन खर्च होवून कापूस व इतर पिकांना भाव मिळत नाही.
सुरवातीला हरभरा दहा हजार रुपये क्विंटल पर्यत होतो आता मात्र सात ते साडेसात हजार रुपये क्विंटलने घेतला जात आहे आणि आता मोठया प्रमाणात हरभरा कापणी, काढणीची सुरुवात झाली असून त्यात हे अस्मानी संकट उभे ठाकले आहे. शासनाने आता सर्व प्रकारे शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून न्याय दिला पाहिजे, ही अपेक्षा शेतकऱ्याची आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या शेतकऱ्यांना आधार शासनाने दयावा, असे शेतकऱ्यांची मागणी आहे.
दि. २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपीट व वादळी व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली माजी. आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी आज सकाळी ११ वाजेपासून निमगव्हाण, तांदलवाडी,द़ोंदवाडे परिसरातुन व चहाडीऀ हातेड परिसर व इतर नुकसानग्रस्त भागाची पाहणीस सुरूवात करत अनेक गावांना भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी दीपक सांळुखे आणि तहसीलदार बाळासाहेब थोरात हजर होते.