पुणे (वृत्तसंस्था) कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे बेरोजगारीला कंटाळून पतीने त्याची पत्नी व १ वर्षे २ महिने वयाच्या लहान मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार कदमवाकवस्ती (ता हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडला आहे.
हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय ३८, सध्या रा. कदमवाकवस्ती) याने पत्नी प्रज्ञा (वय २८) हिचा गळा आवळून तर लहान मुलगा शिवतेज (वय १ वर्षे २ महीने) याचा धारदार सुरीने गळा चिरून खुन करून नंतर स्वतः ओढणीच्या सहाय्याने बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे शिंदे कुटुंब राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.
बेरोजगारीला कंटाळून हनुमंत शिंदे याने कुटुंबाला संपवल्याची माहिती आहे. हत्या आणि आत्महत्या प्रकरणी पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशमधील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















