TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन बोलावं, मी राजीनामा द्यायला तयार : उद्धव ठाकरे

The Clear News Desk by The Clear News Desk
June 22, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मला कोणताही मोह नाही, मी राजीनामा द्यायाल तयार आहे. परंतु, ज्यांना मी नकोय त्यांनी माझ्या समोर येऊन बोला. समोर येऊन बोललात तर संध्याकाळी देखील राजीनामा देतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून सांगितलं आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. या आमदारांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुणीही आपल्याला हिंदुत्व सोडलं असं सांगू नये असा इशारा दिला. महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार तेव्हा शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी सांगितल्यावरच आपण मुख्यमंत्रीपद सांभाळलं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

कोरोना काळात प्रसंग बाका होता. मला प्रशाससनाचा अनुभव नव्हता. कोणीही तोंड देऊ शकलेलं नव्हतं, मला प्रशासनाचा अनुभव नव्हता. मला जे करायचं होतं ते मी प्रमाणिकपणाने केलं. त्यादरम्यानच्या काळात जे सर्व्हे होत होते त्यामध्ये देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची गणणा केली गेली. मी आज कोविडचा विषय घेऊन आलेलो नाही. काही मुद्दे आपल्यासमोर येत आहेत. शिवसेना बाळासाहेबांची आहे का? शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे का? मुख्यमंत्री भेटत का नाही? मुख्यमंत्री भेटत नव्हते.

मुख्यमंत्री म्हणजे मी. हे गेल्या काही दिवसांपूर्वी सत्य होतं. गेल्या काही दिवसांपूर्वी माझी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतरची दोन-तीन महिने हे फार विचित्र होते. मी कुणाला भेटू शकत नव्हते. म्हणून त्या काळात मुख्यमंत्री भेटू शकत नाही ते बरोबर होते. मी माझी पहिली कॅबिनेट मिटिंह ही रुग्णालयातून अटेन्ड केली होती.

शिवसेना आणि हिदुत्वाची घट्ट नाळी आहे. शिवसेना कदापि हिंदुत्वाशी आणि हिंदुत्व शिवसेनेसोबत दूर होऊ शकत नाही. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. म्हणून आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि काही आमदार-खासदार अयोध्येला जावून आले. हिंदुत्वासाठी कुणी काय केलं हे आता बोलण्याची वेळ नाही. शिवसेना कुणाची आहे? काही जण असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत की आता बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. मी असं काय केलंय की शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर चालली आहे.

माझ्यासोबत पहिल्या आणि आताच्या मंत्रिमंडळातले जे सहकारी आहे ते बाळासाहेबांच्या काळाचीलच सहकारी आहेत. मधल्या काळामध्ये जे काही मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं हे लक्षात ठेवा. सध्या राज्यात काय चाललं आहे. राज्यातील काही शिवसेनेचे आमदार गायब. गेले कुठे? पहिले सुरतला गेले नंतर गुवाहाटीला गेले. आता त्यातील काही आमदारांचे आम्हाला फोन येत आहेत. मला त्याच्यामध्ये जायचं नाही. काल-परवी जी निवडणूक झाली. त्या निवडणुकींनंतर आमदार हॉटेलमध्ये होते. तेव्हा मी ज्यांना आपण आपलं मानतो, शिवसैनिक मरमर राबतात निवडून देतात आणि आपल्याच माणसाला एकत्र ठेवावं लागतं. मध्येच कुणीतरी गायब होतं. बाथरुमलाही गेलं तरी शंका. अशी लोकशाही मला आवडणारी नाही.

शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिंदे यांना सेनेच्या 45 पक्षाही जास्त आमदारांचं समर्थन मिळताना दिसत आहे. त्यामुळे शिंदे यांनी शिवसेनाच हायजॅक केली का? असा सवाल उपस्थित केला जातोय. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी अनेक घडामोडी सुरु होत्या. बंडखोरांना परत बोलवण्याचे शर्तीने प्रयत्न सुरु होते. काही महत्त्वाचे निर्णय देखील घेतले गेले. यामध्ये शिंदे यांचं गटनेता पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. पण तो निर्णय अवैध असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. याशिवाय शिवसेनेकडून प्रतोद देखील बदलण्यात आला आहे. तो निर्णयही शिंदे यांनी तांत्रिक गोष्टींचं कारण देत अवैध असल्याचं म्हटलं आहे. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेसमोर येत आपली भूमिका मांडली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

'मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे' ; पालखी मार्गावर उभारण्यात आले फलक 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वरणगाव आयुध निर्माण कारखान्यात नेली दारू ; सामाजिक कार्यकर्त्याची थेट पंतप्रधानांकडे तक्रार !

January 11, 2021

माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद बाबासाहेबांनी दिली : कैलास पवार !

April 24, 2023

चाळीसगावात अठरा लाखांचा अफू जप्त ; पोलिसांकडून कारचा सिनेस्टाईल पाठलाग !

October 9, 2023

जात सर्वेक्षणामुळे शिक्षक व्यस्त ; एणगाव हायस्कूलमध्ये ३१ जानेवारीपर्यंत विद्यार्थीच शिक्षक !

January 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group