मुंबई (वृत्तसंस्था) बेस्टच्या एनसीएमसी कार्डचा लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं.यावेळी मुख्यमंत्र्यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांचा चांगलाच समाचार घेतला. भोंगे वाजवणाऱ्यांना मी काडीची किंमत देत नाही असं ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ज्यांच्या पोटात अॅसिडीटी झाली आहे, आगडोंब उसळला आहे. जळजळतय मळमळतय काय होतंय माहिती नाही. पण त्यांच्या राज्यात त्यांनी मुंबई महापालिकेच्या शाळांचा दर्जा त्यांनी अंगिकारुन दाखवलाय हे माझं उघड आव्हान आहे. पण करायचं काही नाही आणि बिनकामाचे भोंगे वाजवायचे हाच त्यांचा उद्योग आहे. त्यांना मी काडीची किंमत देत नाही.