TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषि क्रांती घडवू या : अनिल जैन

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतातील कृषिक्षेत्राला भविष्य असून जवळपास १२ कोटी हून अधिक शेतकरी योगदान देत आहे. यातील ८० लाखाच्यावर शेतकऱ्यांपर्यत कंपनीचे तंत्रज्ञान, उत्पादने पोहचलेले आहे. येणाऱ्या काळात शाश्वत शेतीसाठी नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषि क्रांती अनुसंधान आणि विकास घडवून आणायचा आहे. त्यासाठी पाणी बचतीसह हवामानातील बदलांवर तग धरणारे आधुनिक उच्च कृषि तंत्रज्ञान देशातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवायचे आहे. यासाठी नवीन व्यवसाय मॉडेल विकसीत करू असा आत्मविश्वास जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केला.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनिल जैन बोलत होते. बांभोरी येथील प्लास्टिक पार्कच्या प्रशासकीय इमारतीसमोरील पटांगणावर झालेल्या सभेच्या व्यासपीठावर अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, सहव्यवस्थापकिय संचालक व चिफ फायनन्शिअल ऑफिसर अतुल जैन, संचालक डी. आर. मेहता, डॉ. एच. पी. सिंग, घनश्याम दास तसेच जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य दलिचंद जैन आणि जैन फार्मफ्रेश फूड्सचे संचालक अथांग जैन उपस्थित होते. तसेच ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कंपनीचे अन्य संचालक व सेक्रेटरी ए. व्ही. घोडगावकर व ऑडिटर्स उपस्थित होते.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

सुरवातीला गत वर्षात दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सभेचे कामकाज सुरू केले. आरंभी सभेतील महत्त्वाच्या विषयांना सर्वांनूमते मंजूरी देण्यात आली. त्यानंतर डी. आर मेहता यांनी संचालक मंडळाच्या वतीने मनोगत व्यक्त केले. यात ते म्हणाले, ‘जैन इरिगेशन कंपनीने विज्ञानासोबत कृषिक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविले आहे. जागितक कठीण परिस्थितीही भागधारक, सहकारी, वितरक, बॅंक व हितचिंतक कंपनीच्या पाठीशी एकजूटीने उभे राहिले. सर्वांच्या सहकार्य आणि विश्वासामुळे पूर्वीपेक्षाही कंपनी अधिक प्रगती करेल असा विश्वास डी. आर. मेहता यांनी व्यक्त केला.’

अनिल जैन यांनी कंपनीचा ताळेबंद सादर केला. आव्हानात्मक परिस्थितीत ही कंपनीने ऑपरेटिंग लिव्हरेज वाढवणे, खर्चाचे योग्य व्यवस्थापनामुळे एकत्रित महसूलात २६ टक्क्यांची वाढ झालेली आहे. कंपनीच्या स्तरावर व जागतिक स्तरावर कंपनीची आर्थिक वाटचाल समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीतील शाश्वत भविष्यासाठी पाण्याची बचत महत्त्वाची आहे यासाठी कंपनीने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवे उत्पादन विकसीत केले आहे याचा अल्पभूधारक शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. ‘हवामानातील बदल हे शेतकऱ्यांपुढील आव्हान आहे त्याला उत्तर फक्त जैन तंत्रज्ञान आहे’ असेही अनिल जैन म्हणाले. सिंगापूर येथील टेमासेकच्या रिव्हूलिस कंपनी सोबत आंतरराष्ट्रीय एकत्रिकरणामुळे २६०० कोटी रूपयांचे कर्ज कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य होत आहे, असा विश्वास अनिल जैन यांनी व्यक्त केला.

गत तीन वर्षाच्या आव्हानात्मक काळात सामाजिक आणि आरोग्य विषयक काळजी याबद्दल कंपनी व कंपनीच्या सेवाभावी संस्था गांधी रिसर्च फाऊंडेशन, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविले गेले आणि राबिविले जात आहेत असे आवर्जून सांगितले. सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला. यावेळी अनुभूती निवासी स्कूल व रायसोनी कॉलेजचे विद्यार्थ्यांनी कंपनीच्या सर्वसाधारण वार्षिक सभेच्या कामकाजाचा अनुभूव घेतला. मुंबई येथून स्क्रुटनीझर अम्रिता नौटियाल ह्या देखील उपस्थित होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2026 !

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
Next Post

हिंगणा शिवारात सर्पमित्रांनी पकडला अजगर ; सुरक्षित सोडले जंगलात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सीए जळगाव शाखेच्या अध्यक्षपदी प्रशांत अग्रवाल

February 21, 2021

राष्ट्रवादी महिला काँग्रेस उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी कल्पना पाटील

March 13, 2021

डंपरला ओव्हरटेक करण्याच्या नादात भीषण अपघात ; तरुणाच्या शरीराच्या उडाल्या चिंधड्या !

March 6, 2022

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३८,७९२ कोरोनाबाधित, ६२४ रुग्णांचा मृत्यू

July 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group