TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सचिन वाझे प्रकरणाचा परिणाम सरकारवर होईल असं मला वाटत नाही : शरद पवार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) “महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीही अडचण नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सर्व सहकारी व्यवस्थित काम करत आहेत. काही समस्या येतात, त्या सोडवल्या जातील.” एका सब इन्स्पेक्टरचा परिणाम संपूर्ण सरकारवर होईल असं मला वाटत नाही. असं शरद पवार यांनी सांगितलं.

“सचिन वाझे प्रकरणाचा परिमाण सरकारवर होईल, यावर आमचा विश्वास नाही,” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. सोबतच महाविकास आघाडीत सर्वकाही सुरळीत असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत. केरळमधील काँग्रेसचे नेते पीसी चाको यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. राज्यात सध्या चर्चा आहे ती निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाची. या प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना विरोधी पक्षाने टार्गेट केलं असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या संपूर्ण प्रकणावर आपली भूमिका मांडली आहे. सोमवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार थेट वाय. बी. चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी गेल्यामुळे या मुद्द्यावरचं गूढ अधिकच वाढलं. आज दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना या मुद्द्यावर प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

सचिन वाझे प्रकरण आणि त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला पोहोचणारी हानी यावरुन शरद पवार नाराज असल्याची चर्चा होती. शिवाय यावरुन महाविकास आघाडीमध्ये मतमांतरं असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र “महाविकास आघाडीत कोणतीही अडचण नाही. काही अडचणी येतात, त्यावर एकत्र मिळून तोडगा काढतात,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

‘सचिन वाझे प्रकरणाचा सरकार परिणाम होणार नाही’

सचिन वाझे प्रकरणावर शरद पवार म्हणाले की, “एका पोलीस अधिकाऱ्याच्या तपासाचा परिणाम सरकारवर होईल यावर आमचा विश्वास नाही. एनआयए याचा तपास करत आहे. त्यावेळी आमचं काम आहे त्यांची मदत करणं. ज्या लोकांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे, त्यांना त्याची जागा दाखवणं यासाठी एनआयए तपास करणार यात काहीही चुकीचं नाही.”

परमबीर सिंह यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा : शरद पवार

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदलीविषयी चर्चा सुरु आहे. यावर शरद पवार म्हणाले की, “परमबीर सिंह यांची बदली होणार आहे की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा. कोणाच्या नियुक्ती आणि बदलीबाबत आम्हाला रस नाही.”

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

वसीम रिजवीला अटक करा व कारवाई करा ; मौलाना आझाद विचार मंचची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात २४ तासांमध्ये कोरोनाचे १५ हजार ९०३ नवीन रुग्ण !

January 13, 2021

सालाबादप्रमाणे पालकमंत्र्यांनी चोपड्यात साजरे केले रक्षाबंधन !

August 31, 2023

अर्णब गोस्वामी आणखी काही दिवस राहणार कारागृहात

November 7, 2020

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 31 जुलै 2024 !

July 31, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group