भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील न्यू आंबेडकर नगरातील रहिवासी असलेल्या चालकाचा दीपनगराजवळील कपिलवस्तू नगरानजीक भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला. सुधाकर वानखेडे (56, न्यू आंबेडकर नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.
वानखेडे हे भुसावळातील बी.एन.अग्रवाल कॉन्ट्रक्टर्स यांच्याकडे चालक म्हणून कामाला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. बुधवारी सायंकाळी वानखेडे हे दुचाकी (एम.एच.19-4649) ने भुसावळकडे निघाल्यानंतर कपिलवस्तू नगराजवळ रस्ता ओलांडत असताना भरधाव होंडा सिटी कार (एम.एच.19 बी.यु.7131) ने धडक दिल्याने वानखेडे यांचा जबर मार बसल्याने जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच भुसावळ तालुका सतीश कुलकर्णी यांच्यासह प्रेमचंद सपकाळे, मोरे आदींनी अपघातस्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
















