पिंपळगाव हरेश्वर (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील एका ४४ व्यक्तीला एका महिलेने शिवीगाळ करत आत्महत्या करण्याची धमकी दिलीय. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात प्रतिभा प्रेमसिंग परदेशी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात शांतीलाल महावीर परदेशी (वय ४४, रा. डांभुर्णी ता. पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शांतीलाल हे त्यांच्या घराच्या ओट्यावर मोबाईलवर बोलत होते. यावेळी घरासमोर राहणारी प्रतिभा प्रेमसिंग परदेशी ही महिला शांतीलाल यांना म्हणाली की, तुझी भाचीने माझ्या व माझ्या पतीविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल का केला?. मी आत्महत्या करून घेईल व तुमचे नाव सांगेल. तसेच तुमची भाची दिसली तर तिच्या तोंडावर अॅसिड फेकून तिला मारून टाकेल, असे म्हणत सदर महिलेने शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर जमिनीवर पडलेला दगड हातात उचलून शांतीलाल यांना मारून फेकला. यात शांतीलाल यांच्या पायाला दुखापत झाली. तसेच शांतीलाल यांची पत्नी व आई यांना देखील शिवीगाळ करत आत्महत्या करून घेईल व तुमचे नाव सांगेल. तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवेल अशी धमकी दिली. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात प्रतिभा प्रेमसिंग परदेशी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. पांडुरंग बंजारा हे करीत आहे.
















