नाशिक (वृत्तसंस्था) मानसिक शांतीच्या शोधात सोशल मीडियामार्फत ओळख झालेल्या समुपदेशकाने महिलेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जोएल जॉन्सन (२६, रा. इंदिरानगर), असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.
पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, कोरोनामध्ये मानसिक संतुलन खराब झाल्याने समुपदेशकाकडे गेलेल्या विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. संशयिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून समुपदेशनाच्या निमित्ताने पीडितेसोबत ओळख वाढविली. त्यानंतर संशयिताने जानेवारी २०२१ ते जुलै २०२३ या कालावधीत प्रेमाचे नाटक करीत पीडितेवर नाशिकसह गुजरात, केरळ, हैदराबाद या ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच संशयिताने पीडितेला मारहाण देखील केली. त्रास असह्य झाल्यानंतर पीडितेने मुंबई नाका पोलि ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली आहे.
















