TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढला तर आटोक्यात आणणे कठीण होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर मोठं विधान केले. ‘कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढला तर तो आटोक्यात आणण्यास कठीण होईल. त्यामुळे आता चाचण्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे’, असे ते म्हणाले.

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कोरोनाच्या स्थितीवरुन सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा केली. त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाची स्थिती या विषयावर चर्चा केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळेत रोखणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोरोना बाबतच्या नियमांचे पालन करणे देखील गरजेचे आहे. कोरोनाविरोधातील गेल्या वर्षभरातील लढाईचे यश बेजबाबदारीत बदलले गेले नाही पाहिजे. वेळेत टेस्टिंग आणि ट्रेसिंग होणे गरजेचे आहे. रॅपिड टेस्टवर अनेक राज्यांमध्ये जोर दिला जात आहे. पण आरटीपीसीआर टेस्ट ८० टक्क्यांच्यावर ठेवायला हव्यात, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

यावेळी कोरोनाचा प्रसार टियर-2 आणि टियर-3 शहरांत देखील वेगाने होत आहे. या शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव याआधी जास्त झाला नव्हता. पण कोरोना जर ग्रामीण भागात पसरला, तर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसेल. छोट्या शहरांमध्ये कोरोना चाचण्या वाढवाव्या लागतील. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आदी राज्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक राज्यांमध्ये लसी वापराविना पडून आहेत, याबाबत नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली. कोरोना लस वाया जाण्याची समस्या गंभीर असून ती वेळीच सुधारायला हवी. तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये कोरोना लस वाया जाण्याचे प्रमाण १० टक्के आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये हे प्रमाण जवळपास तेवढेच असल्याचे मोदींनी म्हटले.

एक वर्षाहून अधिकचा काळ कोरोना विरोधातील लढाईला झाला आहे. कोरोनाचा जसा सामना भारतीय नागरिकांनी केला, ते एक उदाहरण बनले आहे, त्याची प्रशंसाही झाली. देशात आज ९६ टक्के लोक कोरोनामुक्त झाले आहेत. काही राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील ७० जिल्ह्यांत ही वाढ १५० टक्क्यांपर्यंत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला वेळीच रोखले पाहिजे. यासाठी आपल्याला निर्णायक पावले उचलावी लागतील, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

दररोज ३० लाख नागरिकांना लसीचे उद्दिष्ट

उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचा आकडा १० टक्यांवर आहे. देशात दररोज किमान ३० लाख नागरिकांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

धरणगाव येथे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिकात खळबळ : माजी सैनिकाची हेल्मेटने ठेचून हत्या ; धक्कादायक कारण आले समोर !

March 12, 2024

ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटलं, तर वाईट वाटत नाही, पण शुद्राला शुद्र म्हटलं, तर वाईट वाटतं. प्रज्ञा ठाकूर

December 13, 2020

धरणगावात शिवसनेकडून रामदास कदम यांना जोडेमारो आंदोलन ! (व्हिडीओ)

September 21, 2022

चाळीसगावात महसूल लिपिकासह पंटरला ११ हजाराची लाच घेतांना अटक !

September 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group