चोपडा (प्रतिनिधी) मागण्या पूर्ण न झाल्यास १०८ रुग्णवाहिका चालक एक तारखेपासून चक्काजाम आंदोलन करणार आहेत.
आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या दालनात नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र रुग्णवाहिका १०८ वाहन चालक संघटना सलग्न महाराष्ट्र कोअर कमिटी यांच्या मागण्या संदर्भात आरोग्य मंत्री यांनी दिलेल्या सुचणेनुसार महाराष्ट्र शासन व NHM यांच्या बरोबर BVG कंपनीचे चालक यांच्या वेतन देण्याकरिता जो करार झालेला आहे. त्या करारानुसार BVG कंपनी गेली ९ वर्ष वेतन देत नसून आरोग्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार व आपण करार प्रमाणे वेतन देण्याचे मान्य केले असून त्याप्रमाणे वेतन देण्यात यावे.
अन्यथा पुन्हा शासन दरबारी जाऊन पाठपुरावा करू किंवा पुढे होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी BVG कंपनी जबाबदार राहील. तरी गुरुवार दिनांक 31/०८/२०२३ रोजी पर्यंत सदर मागण्यांचा आदरपूर्वक विचार करण्यात यावा, अन्यथा चालक व संघटना पुढील वाटचालीस सुरुवात करतील. किंवा कंपनीला बांधील नसतील.
संघटनेच्या चालकांच्या मागण्या ,12 तास ड्युटीचे वेतन रु.45,000/ हजार इतके मिळावे, मागील नऊ वर्षाच्या किमान वेतनानुसार पगारामध्ये तफावत होती तरी नऊ वर्षाचा किमान वेतन व वार्षिक इन्क्रिमेंट नुसार फरक मिळावा., 2014 ते 2017 PF भरलेला नसून सदर PF भरून मिळावा, सध्या मिळत असलेली पेमेंट स्लीप बदलून पारदर्शकता आणावी. पेमेंट स्लीपमध्ये देत असलेली रिवार्ड पध्दत बंद करावी, सध्या मागणी केलेल्या पगाराच्या मागणीनुसार बेसिक वाढवूण मिळावा, MEMS हे APP बंद करण्यात यावे, वार्षिक २५ टक्के पगार वाढ व्हावी, वार्षिक किरकोळ व अर्जित २४ पगारी सुट्ट्या मिळाव्या ,कोविड भत्ता व कोविड प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात यावे. दि. 21/8/2023 पासून सर्व जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र कोअर कमिटीचे अध्यक्ष तेजस कराडे व जळगाव जिल्हा अध्यक्ष हिंमत नवल धनगर सर्व पायलट बंधु जळगाव व महाराष्ट्रातील सर्व पायलट बंधु सोबत आहेत 1 सप्टेंबर 2023 पासून चक्का जाम आंदोलन राहील पेशंटचे कमी जास्त झाल्यास प्रशासन व बी वी जी इंडिया लिमिटेड कंपनी व शासन जबाबदार राहील, असा ईशारा देण्यात आला आहे.