यावल (प्रतिनिधी) यावल शहरात भर दुपारी गर्दीच्या ठिकाणी खुलेआम सोन्या चांदीच्या दुकानात दरोडा पडतो आणि यावल पोलीस स्टेशनचे अधिकारी हे कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरत असून त्यांच्यावर योग्य ती चोकशी करून कठोर कारवाई करावी, अन्यथा उपोषणाला बसू असा गंभीर इशारा काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष तथा कोरपावली गावचे सरपंच जलीलदादा पटेल यांनी केली आहे.
तसेच त्यांनी यावल पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी भाजी पाले विक्रतेसह इतर व्यावसायिकांना त्रास देत असून अवैध धंदा करणाऱ्यांना पाठीशी घालत असून भेदभाव करत आहे. तरी त्याची ही दूटप्पी भूमिका मुखमंत्री, गृहमंत्री तसेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना पत्राद्वारे कळवणार असल्याचे जलीलदादा पटेल यांनी संगीतले आहे.