जळगाव (प्रतिनिधी) ज्या विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे जमा करूनही जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले नसेल, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपर्क करावा, असे मनसेचे जिल्हा सचिव अँड. जमील देशपांडे यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात जात पडताळणी प्रमाणात उशीरा मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक प्रवेशात मोठा अडथळा निर्माण होत आहे. वर्षभरापासून हजारो जात पडताळणी प्रमाणपत्र क्षुल्लक त्रूटीकरीता पडून आहेत. विद्यार्थी, पालक संबंधित कार्यालयात चकरा मारत आहेत त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. जात पडताळणी समितीवर कायमस्वरूपी सदस्य नाहीत. प्रभारी अधिकारी आपल्या सोयीनुसार येतात. त्यामुळे कामात गतिशीलता नाही. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड कार्यालय, मुंबईपर्यंत सातत्याने तक्रारी येत आहे.
मनसे नेते राज ठाकरे यांच्या आदेशानुसार गरजु विद्यार्थ्यांना नियमानुसार तातडीने जात प्रमाणपत्र मिळावे या करीता मनसेतर्फे संबंधित कार्यालयाला जाब विचारण्या करीता लवकरच आक्रमक आंदोलन उभे करत आहे.
ज्या विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे जमा करूनही जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले नसेल, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव अँड. जमील देशपांडे यांच्या गणपती नगर, जळगाव, येथील कार्यालयात सोमवार दि. ९ ते १२ ऑगस्ट या चार दिवसांत कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.