नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (CM Charanjit Channi) यांनी भाजपचे आदर्श असलेले देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एका विधानाचा संदर्भ देत केंद्रातील सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला आहे. ज्याला आपल्या कर्तव्यापेक्षा आपल्या जीवाची जास्त काळजी असेल अशा व्यक्तीने भारतासारख्या देशात मोठी जबाबदारी घेऊ नये असं सरदार पटेल यांचं वाक्य चन्नी यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून ट्विट केलंय.
तसंच माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नरेंद्र मोदी यांना उद्देशून आपल्या जीवाला कुठे धोका होता? असा प्रश्न उपस्थित करत तुमच्या एक किलोमीटरच्या परिसरात कोणीही नव्हतं. दगडफेक झाली नाही, गोळ्या झाडल्या गेल्या नाहीत, घोषणाबाजीही झाली नाही. तुम्ही असे कसे म्हणू शकता?’ दरम्यान, एवढ्या मोठ्या नेत्याचं एवढं संवेदनशील विधान. लोकांनी तुम्हाला पंतप्रधान म्हणून मतदान केलं. तुम्ही जबाबदारीनं वक्तव्य करायला हवं असं मत चन्नी यांनी व्यक्त केलंय.
















